Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

समता युवा मंचतर्फे राज्यस्तरीय संत रत्न तथा समता भूषण पुरस्कार वितरण

मानवंदना महामानवास या संगीतमय महानाट्याने श्रोते मंत्रमुग्ध

team by team
May 3, 2023
in राजकीय
0
समता युवा मंचतर्फे राज्यस्तरीय संत रत्न तथा समता भूषण पुरस्कार वितरण
नंदूरबार l प्रतिनिधी
                    येथील समता युवा मंच तथा विश्ववंदनीय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरिट नाका परिसर नंदुरबार वतीने महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त “मानवंदना महामानवास” या संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री मा.ना  डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह उपस्थित संसद रत्न खा. डॉ. हिना गावित व जिल्हा परिषद नंदुरबार अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते  करण्यात आले.दरम्यान, कला क्रीडा, सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक चळवळ या माध्यमातून समता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या विशेष योगदानासाठी शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका डॉ.  नूतनवर्षा राजेश वळवी, प्राचार्या एस. ए.एम हायस्कूल, राजकारणातून समाज कार्य करत उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी झटणाऱ्या  डोकारे साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित,
सामाजिक हित जोपासत कार्य  करणारे डॉ. यशपाल जावरे, आदर्श नीपक्षपाती पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात आपला ठसा उमटविणारे पत्रकार बाबासाहेब राजपूत कार्यकारी,मत्स्य सहकारी संस्थेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे युवा उद्योजक प्रवीण शिरसाठ, अनेक वर्षांपासून क्रीडा क्षेत्रातून असंख्य खेळाडू घडविणारे प्रा.डॉ. दिनेश बैसाणे यांना “समता रत्न” या पुरस्काराने तसेच  अल्पशा काळात जिल्हा परिषद प्रशासन अत्यंत जबाबदार व प्रभावीपणे हाताळणाऱ्या जिल्हा परिषद आपल्या दारी या अभिनव उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या दारापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषदेतील 2012 सालापासून प्रलंबित विविध पद भरतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही प्रभावी भूमिका मांडणाऱ्या, जिल्ह्यातील साठ शाळांना कायमस्वरूपी मुख्याध्यापक देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय दिल्याबद्दल युवा नेतृत्व व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मा. डॉ. सुप्रिया गावित यांना राज्यस्तरीय “समता भूषण” पुरस्कार  महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री ना. डॉ. विजयकुमार गावित  तथा खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते देऊन  गौरविण्यात आले.
यावेळी सुलभा महिरे , मनीष बिरारी, मंगेश वाघमारे, जितेंद्र खवळे, प्रांजल बैसाणे आदींचा स्तुत्य निवडी संदर्भात सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमास नंदुरबार आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर,  नंदू गावित, , जि. प. सदस्य मोहन  शेवाळे, एस.ए.एम मिशन हायस्कूलचे संचालक राजेश वळवी, नगरसेवक नरेंद्र नगराळे, चंद्रकांत नगराळे शहादा नगरसेवक जितू जमदाडे ,नानाभाऊ निकम अनिल कुवर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजू रगडे, पत्रकार जीवन पाटील, पत्रकार भूषण रामराजे, पत्रकार गौतम बैसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राम साळुंके सुभाष पानपाटील, सचिन पिंपळे, भैय्या बाविस्कर, जितेंद्र पानपाटील, प्रशांत पाटील ॲड. प्रेमानंद इंद्रजीत राहुल रामराजे सिद्धार्थ साळुंखे, गणेश शिरसाठ, गौतम पानपाटील, श्याम साळुंके, सुलतान पिंजारी, संतोष शिरसाट, अजित कुलकर्णी, दीपक बंडीवार, किरण खोकले आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षबोध बैसाणे  यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात ध्वजवंदन

Next Post

नंदुरबार येथे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन, 10 दिवस बालकलावंतांना मिळणार नाटकाचे धडे

Next Post
नंदुरबार येथे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन, 10 दिवस बालकलावंतांना मिळणार नाटकाचे धडे

नंदुरबार येथे बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन, 10 दिवस बालकलावंतांना मिळणार नाटकाचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add