Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील सुरू असलेल्या विकास कामांवर नियंत्रण कुणाचे ?

team by team
May 2, 2023
in राजकीय
0
शहादा येथील सुरू असलेल्या विकास कामांवर नियंत्रण कुणाचे ?
शहादा l प्रतिनिधी
   येथील पालिकेवर सध्या प्रशासक राज असून शहरातील विविध भागात सुरू असलेल्या कामांवर नेमके प्रशासनाचे नियंत्रण आहे किंवा नाही? याबाबत शहरवासीयांना प्रश्न पडला आहे. विकास हायस्कूल मागील प्रकाशा रोडला जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर पालिकेमार्फत महाराष्ट्र दिनाची सुटी असतांना काम करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा रहदारीचा रस्ता खोदल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी व कामावर हजर व्यक्तींनी पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार काम होत असल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत.
   याबाबत अधिक वृत्त असे, गत सुमारे दीड वर्षापासून पालिकेवर प्रशासक राज सुरू आहे. पदाधिकारी नसल्याने प्राथमिक सोयी सुविधांसाठी नागरिकांना ताटकळत राहावे लागत आहे. अशातच प्रशासकांकडून शहरातील विविध भागात विकास कामांच्या नावाखाली कामे करण्यात येत आहेत. मात्र,या कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फलक लावले नसल्याने नेमके काम कोणत्या निधीतून होत आहे? याबाबत शहरवासीयांना प्रश्न पडला आहे. काही ठिकाणी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली नसतांनाही कामे केली जात असून असाच काहीसा प्रकार शहरातील विकास हायस्कूल मागील प्रेस मारुती परिसरात असलेल्या प्रकाशा रस्त्याला जोडणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर झाला आहे. दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनाची सर्वत्र सुट्टी असतांना हा रहदारीचा रस्ता खोदण्यात आला आहे.
या ठिकाणी जेसीबी मशीनचा वापर करून पाईप टाकण्यात येत आहेत.जेसीबी व चार मजुरांच्या उपस्थितीत केल्या जात असलेल्या कामाबाबत वाहनधारक व नागरिकांनी विचारणा केली असता संबंधितांनी कानावर हात ठेवून सदर काम पालिकेमार्फत केले जात असल्याचे सांगितले. ड्रेनेजची पाईपलाईन मुख्य पाईपलाईनला जोडण्यासाठी रस्ता खोदण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत काही नागरिकांनी पालिकेशी संपर्क साधला असता बांधकाम विभागातील अभियंता आशिष महाजन यांनी याबाबत मुख्याधिकारी तथा प्रशासकच माहिती देऊ शकतील असे सांगून कानावर हात ठेवले.
मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता त्यांच्या मोबाईल बंद येत असल्याने खऱ्या अर्थी शहादा नगरपालिकेत प्रशासक राज सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे. सदर काम नेमक्या कोणत्या निधीतून तसेच कोणाच्या तांत्रिक व प्रशासकीय मंजुरीने करण्यात येत आहे याबाबत याबाबत चर्चा केली जात असून मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी माहिती देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, याच प्रभागातील संभाजीनगर भागात रस्ते तयार करण्यात आले आहेत. मात्र ड्रेनेज व सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटारीची सुविधा केली नसल्याने रहिवाशांना उघड्यावर पाणी फेकावे लागत आहे.यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच खुल्या जागांवर पाणी टाकण्यात येत असल्याने शेजारील रहिवाशांशी वाद निर्माण होत असल्याने पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी याची दखल घेऊन या भागात सांडपाणी वाहतुकीसाठी गटारींची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मिशनच्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी यांचा समतारत्न पुरस्काराने गौरव

Next Post

अनोळखी तरूणाचा, नंदुरबार येथे आढळला मृतदेह, पत्रकारामुळे पटली ओळख

Next Post
अनोळखी तरूणाचा, नंदुरबार येथे आढळला मृतदेह, पत्रकारामुळे पटली ओळख

अनोळखी तरूणाचा, नंदुरबार येथे आढळला मृतदेह, पत्रकारामुळे पटली ओळख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add