Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : पातोंडा येथे युवकाचा आढळला मृतदेह ?, शेतात आढळला महिलेचा मृतदेह

team by team
May 1, 2023
in क्राईम
0
मोठ्ठी बातमी : पातोंडा येथे युवकाचा आढळला मृतदेह ?,  शेतात आढळला महिलेचा मृतदेह

नंदुरबार l प्रतिनिधी

 

तालुक्यातील पातोंडा येथे सकाळच्या सुमारास 21 वर्षीय तरुणाचा एका घरात आदिवासी वस्तीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. तर दुसऱ्या घटनेत कोळदा ते लहान शहादा रस्त्याजवळ बाजरीच्या शेतात 35 ते 40 वर्षीय अनोळखी महिलेचा अज्ञात कारणातून खून झाला आहे. महिलेची ओळख पटलेली नसून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, पातोंडा येथील नरेश मन्साराम ठाकरे (वय 21) हा तरुण चार दिवसापूर्वी सौराष्ट्र येथून गावात आला होता. तरुण हा अविवाहित असून नेमका मृत्यू कशामुळे झाला हे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकासह मोठा फौज फाटासह दाखल झाले होते. यावेळी घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी तरुणाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

 

 

 

नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तसेच कोळदा शिवारातील एका बाजरीच्या शेतात एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती सदर घटना वाऱ्यासारखी पसरतात या घटनेची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक पी आर. पाटील यांना मिळताच तात्काळ तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे.

 

 

यावेळी तसेच ठसे तज्ञांना पाचाराण करण्यात आले होते. यानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरण खेडकर , नंदुरबार तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी होते. या घटनेची नोंद नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवनिर्मित जिल्ह्यातील अग्रगण्य विकसित जिल्हा म्हणून नंदूरबारची ओळख देशात : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

वाघाची कातडी व वाघनखांसह टोळी जेरबंद, न्यायालयाने सुनावली चौघांना चार मे पर्यंत वनकोठडी

Next Post
वाघाची कातडी व वाघनखांसह टोळी जेरबंद, न्यायालयाने सुनावली चौघांना चार मे पर्यंत वनकोठडी

वाघाची कातडी व वाघनखांसह टोळी जेरबंद, न्यायालयाने सुनावली चौघांना चार मे पर्यंत वनकोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add