नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. आज नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. १६ मतदान केंद्रांवर निवडणूक होणार आहे.दरम्यान उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजारसाठी समितीसाठी ३७ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी एकूण १६ मतदान केंद्रांवर आज २ हजार ५६० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७० सहकारी संस्थांमधील ८३३, १३८ ग्रामपंचायतींमधील १२४५, २४५ व्यापारी, आडते तर २३७ हमाल तोलारी मतदारांचा समावेश आहे. यासाठी एकूण १६ मतदान केंद्रांंची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे १०० कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारती ठाकूर यांनी दिली आहे.
नंदुरबार, नवापूर व शहादा बाजार समितीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार असून प्रशासन सज्ज झाले आहे. दरम्यान मतदार राजा नेमके कोणाच्या बाजूने कौल बजावतो हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








