नंदूरबार l प्रतिनिधी
भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या सुचनेनुसार नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व उदयोग आघाडी कार्यकारणी जिल्हाध्यक्षसह बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच पुढील कार्यकारणी घोषित करण्यात येईल याची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी. अशी माहिती भाजपा जिल्हा कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आली आहे.