Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

Mahesh Patil by Mahesh Patil
April 25, 2023
in शैक्षणिक
0
अखेर जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतंर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नतीचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सभेत अनेकदा करण्यात आली होती.त्यानंतर शिक्षण विभागाने कालअखेर जिल्ह्यातील ६० शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती दिल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या सभेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतंर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या मुख्याध्यापकपदी पदोन्नतीबाबत जि. प.सदस्य आक्रमक झाले होते. त्यानंतर अखेर प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक तसेच पदवीधर शिक्षकांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी दि.२० एप्रिल रोजी आयोजित पदोन्नती समितीच्या बैठकीत मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे.

 

 

सदर पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षकांना पदोन्नतीने पदस्थापना देण्यासाठी काल जि.प.च्या याहा मोगी सभागृहात समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ.युनूस पठाण व निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी.जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ठ सहाय्यक मिलिंद जाधव व उमेश पाटील, कनिष्ठ सहाय्यक परेशकुमार वळवी, सुनिल गिरी, प्रशांत गोसावी व स्वप्निल पाटील, संगणक चालक आसिफ पठाण व योगेश रघुवंशी कार्यालयीन कर्मचारी शितल भदाणे यांनी परिश्रम घेतले.

 

 

 

सदर पदोन्नती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबविण्यात आल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत पदोन्नती मुख्याध्यापक संवर्गाच्या रिक्त असलेल्या ६७ पदांपैकी नंदुरबार तालुक्यात १०, नवापूर तालुक्यात ४, शहादा तालुक्यात २२, तळोदा तालुक्यात १०, अक्कलकुवा तालुक्यात ९ व धडगांव तालुक्यात ५ अशी एकूण ६० रिक्त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी समुपदेशन प्रक्रिया राबवुन पसंतीने पदस्थापना देण्यात आली.

दरम्यान याबाबत प्रहार शिक्षक संघटनेच्या मागणीचे यश आले असून त्यांनी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला होता.याबाबतचे निवेदन ही अनेकदा दिले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, तिघांना अटक

Next Post

भुजगाव येथे घर जळून खाक लाखोंचे नुकसान, कुटुंब उघड्यावर

Next Post
भुजगाव येथे घर जळून खाक लाखोंचे नुकसान, कुटुंब उघड्यावर

भुजगाव येथे घर जळून खाक लाखोंचे नुकसान, कुटुंब उघड्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group