Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची ;जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार-जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
April 22, 2023
in राज्य
0
जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची ;जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार-जिल्हाधिकारी मनीषा खत्री
नंदुरबार l प्रतिनिधी
 विविध विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येणार असून विविध योजनाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली.
शासकीय योजनांची जत्रा उपक्रम राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, मीनल करनवाल, मुख्याधिकारी पुलकीत सिंह, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, शासकीय योजनांची जत्रा उपक्रमांत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ या उपक्रमांतर्गत देण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात येणार असल्याने हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दोन दिवसात जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जिल्हा जनकल्याण कक्षाची स्थापना करावी. प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विहीत नमून्यात गुगल शिटवर भरुन द्यावी. तसेच प्रत्येक विभागाने दररोज केलेल्या कामाचा अहवाल गुगल शिटवर  उपलब्ध करुन द्यावा.
यासंदर्भात प्रत्येक विभागाने आपल्यास्तरावर बैठका घ्याव्यात. जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांची यादी तयार करावी. या योजनांची माहिती, योजनेच्या लाभासाठी पात्रतेचे निकष, लाभार्थ्यांची माहिती सर्वसमान्य नागरीकांपर्यंत पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे, त्यांच्याकडून अर्ज भरुन घेणे इत्यादी कार्यवाही ही 15 मे पूर्वी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.
जत्रा शासकीय योजनांची उपक्रम जिल्हा व तालुकास्तरावर 15 जूनपूर्वी दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरीकांना योजनांचा थेट लाभ प्रदान करावयाच्या असल्याने सर्व विभागांनी त्यादृष्टिने परिपूर्ण नियोजन करुन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी या उपक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. बैठकीस सर्व तहसिलदार, मुख्याधिकारी उपस्थित होते.
दृष्टिक्षेपात जत्रा शासकीय योजनांची
अभियानांत किमान 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ प्रदान करणार
 अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करुन घेणार.
उपक्रमांची पूर्वतयारी 15 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 या कालावधीत
जिल्हात 15 एप्रिल ते 15 जून 2023 या कालावधीत उपक्रम राबवणार
अभियानात शासनाचे विविध विभाग सहभागी होणार
 सर्व विभाग एकाच छताखाली एकत्र येऊन लाभार्थ्यांना लाभ
बातमी शेअर करा
Previous Post

शासकीय जमिनीवर अतिक्रमण, केळी येथील ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र घोषित

Next Post

हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील

Next Post
हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील

हिवताप निर्मूलनासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -जिल्हा हिवताप अधिकारी अर्पणा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add