Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय,निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी

team by team
April 21, 2023
in राज्य
0
शासकीय,निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी  महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी
नंदुरबार l प्रतिनिधी
प्रतिवर्षी तिथीनुसार अक्षय तृतीयेला क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक, जगतज्योती, महात्मा बसेश्वर महाराज यांची जयंती असतेे. अनेक वर्षापासून मंत्रालयासह राज्यात सर्वत्र महात्मा बसवेश्वर जयंती साजरी होत आहे.त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये देखील महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन आणि सामाजिक उपक्रम व्हावेत अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेतर्फे करण्यात आली आहे.
 यासंदर्भात महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे  यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थोर समाज सुधारक, महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती यंदा शनिवार दि. 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीयेला आहे.यापूर्वी जिल्हा  प्रशासनाला सन 2009 मध्ये महाराष्ट्र बसव परिषद नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी   प्रशासनाला आदेश देऊन जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय वगळता इतर कुठल्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त प्रतिमापूजन होत नसल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयासह राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयात जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्याचे अध्यादेश शासनाने यापूर्वीच काढले आहेत.
त्यानुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील सर्वच कार्यालयात सदर कार्यक्रमा आयोजित करण्याबाबत आवश्यक सूचना  करून अंमलबजावणी बाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनातर्फे परिपत्रकाद्वारे देण्यात आलेल्या आहेत. लिंगायत धर्माचे संस्थापक, क्रांतीसुर्य, थोर समाज सुधारक, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेला तिथीनुसार प्रतिमा पूजन करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू विठ्ठल हिरणवाळे व पदाधिकारी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

माघारीअंती तळोदा, धडगाव बाजार समिती बिनविरोध, अक्कलकुवा येथे १५ जागा बिनविरोध

Next Post

कृषी महाविद्यालय शहादा येथे समता पर्व साजरा

Next Post
कृषी महाविद्यालय शहादा येथे समता पर्व साजरा

कृषी महाविद्यालय शहादा येथे समता पर्व साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add