नंदूरबार l प्रतिनिधी

शहादा शहरातील राज मोटर्स या ट्रॅक्टरच्या शोरूम ला शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागली असून या आगीत ६ पेक्षा अधिक ट्रॅक्टर व ९ इलेक्ट्रिक बाईक जळून खाक झाले.इतर साहित्यही जळाल्याने कोट्यावधी रुपयांच्या नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अंदाज आहे.

शहादा शहरातील राज मोटर्स या आयशर ट्रॅक्टर च्या शोरूम ला काल रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली असून आगीत वीस पेक्षा अधिक ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे .
शोरूम ला लागलेल्या आगीने उग्र रूप धारण केल्यानंतर आज संपूर्ण परिसरात पसरली शोरूम आणि परिसरात लावलेली ट्रॅक्टर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. राज मोटर्स हे शोरूम पूर्ण जळून गेल्याने इतर महत्वाच्या साहित्याचा नुकसान झाल्याचा अंदाज आहे आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आले नसले तरी स्थानिक नागरिक आणि शहादा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने पहाटे पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवले होते. आगीत कोट्यावधी रुपयाचा साहित्याचे नुकसान
झाल्याचा अंदाज आहे.









