Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सर्व सुविधांनीयुक्त इनडोअर स्टेडियमची उभारणी करावी ;तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करावे :पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
April 13, 2023
in राजकीय
0
सर्व सुविधांनीयुक्त इनडोअर स्टेडियमची उभारणी करावी ;तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करावे :पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार शहरात सर्व सुविधांनीयुक्त वातानुकुलीत इनडोअर स्टेडियमची निर्मिती करण्याबरोबरच तालुका क्रीडा संकुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

 

 

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

 

 

यावेळी बोलतांना मंत्री डॉ. गावित म्हणाले, मिशन संकुल अंतर्गत शासनाने जिल्हा क्रीडा संकुल या प्रकल्पास सध्याची अनुदान मर्यादा रु. 800.00 लक्ष वरुन सुधारित अनुदान मर्यादा रु.1500.00 लक्ष केलेली आहे. या निधीतुन इनडोअर हॉल-अद्यावत करणे, 400 मी ट्रॅक सिंथेटिक करणे, वसतीगृह इमारत अद्यावत करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, नविन वसतीगृह इमारत नविन बांधणे, वसतीगृह इमारत अद्यावत करणे, मुलांमुलींकरीता स्वच्छता गृह बांधणे, विविध क्रीडांगणे तयार करणे, जलतरण तलाव अद्ययावत करणे ही कामे प्राध्यान्य क्रमाने हाती घेण्यात यावीत.

 

 

 

ते पुढे म्हणाले, जिल्हा क्रीडा संकुल समितीने नियुक्त केलेल्या वास्तुविशारदाच्या नियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी, जेणेकरुन सुधारित शासन निर्णयान्वये जिल्हा क्रीडा संकुलातील विकसित करावयाच्या क्रीडा सुविधांचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करणे सोयीचे होईल. जिल्हा क्रीडा संकुलातील शुटींग रेंज हॉल व वसतीगृह इमारत मागील संरक्षण भिंत पडलेली आहे. सदर भिंत पडलेली असल्यामुळे मोकाट गुरे संकुलात येतात त्यामुळे संरक्षण भिंत व मुख्य व्दार दुरुस्त करणे आवश्यक आहे.

 

 

त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी रु.99.64 लक्ष व रु.99.77 लक्ष इतक्या रकमेचे असे दोन अंदाजपत्रक सादर केलेले होते. त्यापैकी जिल्हा क्रीडा संकुलाचे उत्तर व पश्चिम बाजूची भिंतीचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आलेली असुन उर्वरीत पुर्व व दक्षिण बाजूची संरक्षक भिंत दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

*तालुका क्रीडा संकुलाच्या कामास प्राधान्य*

तालुका क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधांचा कामे प्राधान्य क्रमाने हाती घेउन बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी रु.500.00 लक्ष इतकी अनुदान मर्यादा असुन आदिवासी विकास विभागातून त्यासाठी जास्तीचा निधी देण्यात येईल. त्यात 200 मी. धावनपथ तयार करणे,

 

 

इनडोअर हॉल वुडन सिंथेटीक फ्लोरिंगसह, चेजिंग रुम, स्टोअर रूम, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लॉनटेनिस, ऑर्चरी कार्यालयीन इमारत, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत इत्यादी क्रीडा सुविधा तसेच प्रेक्षक गॅलरी व गॅलरीच्या मागील बाजूस तालुका क्रीडा संकुलाच्या उत्पन्नाचा दृष्टीने रोडालगत दोन मजली दुकान गाळे तयार करण्यासाठी बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करावेत, असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

बीड मध्ये धडगावच्या मजुरांची पिळवणूक, 40 मजुर अडकले

Next Post
बीड मध्ये धडगावच्या मजुरांची पिळवणूक,   40 मजुर अडकले

बीड मध्ये धडगावच्या मजुरांची पिळवणूक, 40 मजुर अडकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकेल : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

October 21, 2025
आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते गाय वासरू शिल्पाचे लोकार्पण

October 21, 2025
चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

चांदसैली घाटातील दुर्घटना अत्यंत वेदनादायी; राज्य शासन अपघातग्रस्त कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे : पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

October 21, 2025
निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

निवडणुकीत जनतेला ग्राह्य धरू नये; आ.चंद्रकांत रघुवंशी

October 20, 2025
आ.डॉ. विजयकुमार गावित यांनी पाठपुरावा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश

नंदुरबार जिल्ह्याला मिळणार सुमारे 54 लाख रुपयांचा निधी

October 20, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group