Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे प्रशासनाला निवेदन

team by team
April 13, 2023
in सामाजिक
0
नंदुरबार जिल्हा बँड युनियनतर्फे प्रशासनाला निवेदन
नंदुरबार  l प्रतिनिधी
सध्या लग्नसराईंसह इतर कार्यक्रमांमध्ये वाद्य वाजवण्यासाठी जाणाऱ्या बँड चालकांच्या वाहनांना आरटीओ आणि पोलीस प्रशासनातर्फे अडविण्यात येत असून कारवाईचा ससेमिरा सुरू आहे.प्रशासनाने बँडसाठी वाहनांना परवाना मंजूर करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा बँक युनियनतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बँक कलाकार उत्कर्ष संघटना पुणे संचलित नंदुरबार जिल्हा बँड युनियनचे जिल्हाध्यक्ष सुनील पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी जिल्हा प्रशासनासह पोलीस विभागाला निवेदन देण्यात आले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी कल्पना निळठुबे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बँड वादक केवळ दोन ते तीन महिने मोल मजुरी करून परिवाराचे पोट भरतात. परंतु सध्या आरटीओ आणि पोलीस विभागातर्फे वाहने पकडण्याची मोहीम सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात 40 ते 50 हजार कलाकार बँड व्यवसायावर पोट भरत असून कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील देण्यात आली आहे.निवेदन देण्यासाठी नंदुरबार जिल्हा बँड युनियनचे अध्यक्ष सुनील पवार (प्रकाशा) उपाध्यक्षअमित डामरे (तळोदा) किशोर वळवी, प्रमेश वसावे, विकी ठाकरे,  नेहरसिंग नाईक,हरीश पाडवी,अजय गावित, अर्जुन वळवी, योगेश पाडवी, दीपेश भिल,करमसिंग मोरे, गुलाब पाडवी ,अनिल वळवी, मोहन वळवी, धरमसिंग पाडवी, सुरेश वळवी,अशोक गावित, प्रतिक वसावे,आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कापसाच्या शेतात गांजाची शेती, २३ लाखाचा ३३३ किलो गांजा जप्त

Next Post

जलजीवन मिशनमध्ये पाड्यांच्या समावेश होण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करा : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add