नंदुरबार l प्रतिनिधी
जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्रुटीपूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्वअंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात येत असून अर्जदारांनी त्यांना कळविण्यात आलेल्या त्रुटीसह व मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयाच्या “नागरी सुविधा केंद्रात” कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत उपस्थित राहून त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत ” सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे यामोहिमेअंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदूरबार कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रुटी पुर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांना नोंदणी केलेल्या ई-मेलवर CCVIS-II प्रणालीव्दारे त्रुटी कळविण्यात आल्या आहेत.
अर्जदारांनी त्रुटींची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांची प्रकरणे त्रुटीपूर्ततेअभावी प्रलंबित आहेत. अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत सामाजिक समता पर्व अंतर्गत विशेष मोहिमेअंतर्गत अर्जदारांनी त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी. वरील कालावधीत त्रुटींची पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री. पाटील यांनी कळविले आहे.