Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिम

team by team
April 11, 2023
in शैक्षणिक
0
11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिम
नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत ” सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत असून याअंतर्गत समाजकल्याण आयुक्त पुणे व महासंचालक, बार्टी पुणे यांच्या निर्देशानुसार राज्यातील इयत्ता 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य राकेश पाटील यांनी कळविले आहे.
या कालावधीत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात नंदुरबार जिल्ह्यातील इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फॉर्मसी, विधी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी सदर अभ्यासक्रमाची शिक्षण फीची प्रतीपूर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.
तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, व्दितीय व तृत्तीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या मागास प्रवर्गातील अद्याप समितीकडे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाईन भरलेले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सर्व मुळ कागदपत्र अपलोड करुन व अर्ज भरुन ते अर्ज अपलोड केलेल्या सर्व मुळ कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह व मुळ शपथपत्रांसह (Hard Copy) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबारच्या “नागरी सुविधा केंद्र ” येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत जमा करावेत.
अर्जदारानी अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल व मोबाईल क्रमांकाव्दारेच अर्ज नोंदणी करावा. समितीने त्यांच्या प्रकरणावर निर्णय घेतल्यानंतर निर्णय/जात वैधता प्रमाणपत्र हे त्यांनी नोंदणी केलेल्या ईमेलवर प्राप्त होत असते. आपला युझर आयडी व पासवर्ड व्यवस्थित जतन करुन ठेवण्यात यावा, असे आवाहनही जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य श्री. पाटील यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

ग्लैंडर्स साथ रोग आढल्याने शहादा हे बाधित व निगराणी क्षेत्र घोषित : जिल्हाधिकारी मनिषा खत्री

Next Post

जातपडताळणीच्या त्रृटींच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

Next Post
जातपडताळणीच्या त्रृटींच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

जातपडताळणीच्या त्रृटींच्या पुर्ततेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add