नंदुरबार l प्रतिनिधी
भूमापन दिन जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. भुमापन दिनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचे हस्ते करणेत आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती अप्पर जिल्हाधिकारी धनजय निकम उपस्थित होते.
प्रथम जिल्हाधिकारी श्रीमती खत्री व उपस्थित मान्यवर यांचे हस्ते मोजणी साहित्याचे पुजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी मॅडम यांनी ड्रोनव्दारे मोजणी झालेले गावांचे नकाशे, सनदा व मिळकत पत्रिका याची पहाणी केली. तसेच त्यांच्या हस्ते नाविन्य पुर्ण योजनेतुन सर्व उप अधीक्षक भूमि अभिलेख, कार्यालयांना मोजणीचे रोव्हर वाटप करणेत आले.

प्रस्ताविक भूमी अभिलेख कार्यालयाच्या जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे यांनी केले. प्रास्ताविक मध्ये मोजणीचा इतिहास व जिल्हयात सुरू असलेले डिजिटायझेशन प्रकल्प, ड्रोन सर्व्हे प्रकल्प, वनहक्कदावे, मोजणी प्रकरणे इ झालेल्या कामाच्या प्रगतीची माहिती दिली.
कार्यक्रमास नंदुरबार कार्यालयाचे उप अधीक्षक स्मिता गावित तळोदा कार्यालयाचे उप अधीक्षक सतिष बोरसे अक्कलकुव्याचे उप अधीक्षक अरूण ठाकुर यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील मोजे कुभांरखान या गावातील सनद वाटपाचा कार्यक्रम उपअधीक्षक अरूण ठाकुर त्यांच्या जिल्हा अधीक्षक स्वाती लोंढे यांनी सत्कार केला.
नंदुरबार जिल्हयात चालु असलेले डिजिटायझेयन चे प्रशिक्षण रोहित मालपुरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले. संतोष जाधव, भूकरमापक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डि.ए. बावीस्कर नंदुरबार यांनी केले व आभार प्रदर्शन महेंद्र राजपुत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रविण दुसाणे, एम.डी.गावित, देविदास पाटिल व संजय वळवी, मिलींदर पाडवी यांनी परिश्रम घेतले.








