नंदुरबार l प्रतिनिधी
मराठा समाज परिवर्तन चळवळ व मराठा समाज युवा परिवर्तन चळवळ तसेच मराठा समाज प्रबोधन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने समाजातील युवकांसाठी शैक्षणिक , व्यावसायिक व शेती विषयावर नंदुरबार तालुकास्तरीय मार्गदर्शन शिबिर येथील जिजामाता महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पावबा मराठे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून प्रल्हाद मराठे, श्रावण मराठे, विपुल मोगल, विखरणचे सरपंच रोहिदास साळुंखे , किशोर साळुंखे, भटू बोराणे, योगेश मराठे आदी उपस्थित होते. याप्रसंगी युवा नेते डॉ.विक्रांत मोरे यांनी कार्यक्रमासाठी प्रोजेक्टर व वर्ग खोली उपलब्ध करून दिली होती.
दरम्यान कार्यक्रमाप्रसंगी मराठा समाज परिवर्तन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक विठ्ठल मराठे यांनी युवकांना पीपीटी प्रोजेक्टद्वारे समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक , व्यावसायिक , सामाजिक तसेच पारंपारिक असलेली शेती व्यवसायाविषयी आधुनिक शेती कशी करावयाची याविषयी त्यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले. तसेच ते म्हणाले की जिल्हाभरात तळोदा , शहादा , अक्कलकुवा व नवापूर येथे युवकांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
यावेळी मनोगत रवींद्र शिंदे, प्रा.भरत खैरनार, प्रा.सुनील नाईक , अर्जुन खांडवे, मनोज गागरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश चौधरी यांनी केले. तर आभार अण्णा पवार यांनी मानले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजातील युवक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी दिनेश बोराणे , भटू आव्हाळे, हेमंत कदम, खंडू सरोदे , युवराज पाटील आदींनी परिश्रम घेतले.








