Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंदिरात झाड कोसळून ७ जणांचा मृत्यू

team by team
April 11, 2023
in क्राईम
0
मंदिरात झाड कोसळून  ७ जणांचा मृत्यू

अकोला l

 

बाळापूर तालुक्यातील पारस येथील बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनास्थळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल जखमींची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली.

 

अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी आहेत. अकोला जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला.

 

 

दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांनमध्ये आरती सुरू होती. मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली दर्शनासाठी तसेच पावसापासून आपला बचाव करण्यासाठी रस्त्यावरील वाहन धारक असे एकत्रित ४५ पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. अचानक यादरम्यान मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडूलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. शेड खाली असलेले सर्व लोक या खाली दबल्या गेले. या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून वाचवण्यात आले आहे. यातील काही लोकांना हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमींचा आकडा २५ आहे.

 

पारस येथे भेट व पाहणी

दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज पारस येथे भेट देऊन काल घडलेल्या दुर्घटनाग्रस्त स्थळाची पाहणी केली. कृषी सहसंचालक किसन मुळे, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे,  उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी, तहसिलदार सैय्यद ऐसामुदीन आदींची त्यांच्या समवेत उपस्थिती होती. कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, बाबुजी महाराज संस्थानातील सभामंडपावर 100 वर्ष जुने झाड कोसळून घडलेली घटना दुदैवी आहे. या दुर्घटनेत सात व्यक्ती मयत झाले. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. जखमींवर शासकीय खर्चाने पूर्ण उपचार करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालयातही उपचार करु. या दुर्घटनेतील बाधितांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अवकाळी पाऊस व वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करावे. रात्री झालेल्या वादळात वीज पुरवठा विस्कळीत झाला असून तो पूर्ववत करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जखमींची भेट

दरम्यान  कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दुर्घटनेतील जखमींची भेट घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भेट दिली. त्यांचे समवेत विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.मुरली इंगळे आदी उपस्थित होते. कृषीमंत्र्यांनी उपचारार्थ दाखल जखमींची आस्थेवाईकपणे  चौकशी करुन त्यांना सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी, मदतीबाबत मंत्रिमंडळात लवकरच निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

शहादा येथे लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
शेल्टापाणी येथे दोन गटात वाद,  तिघे जखमी ; परस्पर फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा

शहादा येथे लग्नात नाचण्याच्या कारणावरुन मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add