नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा ग्रंथालय संघ संचलित ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने पालन वर्ग-२०२३ चे उदघाटन समारंभ दि.०८/०४/२०२३ शनिवार रोजी सांय ५.३० वाजता येथील लोकमान्य टिळक जिल्हा वाचनालयाचा सभागृहात संपन्न झाला.
या समारंभाचे उदघाटकपत्रकार रमाकांत पाटील, तर अतिथी म्हणून माजी ग्रंथपाल प्रा.आबोली चंद्रात्रे हे होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. पीतांबर सरोदे होते प्रथम ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून कार्यक्रमाचे सुरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परीचय प्राचार्य प्रवीण पाटील, यांनी केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना यावेळी प्रा. अबोली चंद्रात्रे यांनी ग्रंथालय शास्त्राची पदवी घेतली त्याचा फायदा पुढील काळात झाला म्हणून शिक्षण कधीही वाया जात नाही त्याचा उपयोग आयुष्यात निश्चीत होतो याचे महत्व पटवून दिले.प्रा. गणपत पाटील यांनी ही ग्रंथालया शास्त्राचे शिक्षणाचे महत्व पटवुन दिले. समारंभाचे अध्यक्षीय समारोप प्रा. डॉ. पीतांबर सरोदे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, तसेच व्यासपिठावर रमाकांत पाटील, प्रा. अबोली चंद्रात्रे. प्रा. गणपतराव पाटील, प्रा. विवेक अर्थोकर, प्रा. दिपाली पाटील, हे व्यासपीठावर उपस्थितीत होते.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. वर्षा टेभेकर यांनी केले. यावेळी मोठया विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी बीपीन पाटील, सुदाम राजपुत, सुनिल मराठे यांनी प्रयत्न केले. ज्या विद्यार्थीनी शैक्षणिक संच नेलेले नाही त्यांनी लवकरात लवकर न्याचे जेणे करुण अभ्यासक्रमाची सुरूवात करता येवू शकेल तसेच ज्यांचे प्रवेश बाकी असतील लवकरात लवकर घ्यावेत असे असे आवाहन यावेळी करण्यात आले.