Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नखचित्र कलेद्वारे साकारलेल्या भगवद्गीतेची ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ मध्ये नोंद,खा.डॉ.हीना गावित,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला सत्कार

team by team
April 10, 2023
in राष्ट्रीय
0
नखचित्र कलेद्वारे साकारलेल्या भगवद्गीतेची ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ मध्ये नोंद,खा.डॉ.हीना गावित,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला सत्कार
नंदुरबार l प्रतिनिधी
 येथील रहिवासी व शिंदखेडा तालुक्यातील जखाने येथील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नखचित्रांच्या माध्यमातून कागदावर श्रीमद् भगवद्गीता साकारली. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी ७०० श्लोकातील १४०० ओळी नखचित्र कलेच्या माध्यमातून लिहिल्या होत्या. याची दखल इंडिया बुक ऑफ द रेकार्डने घेतली असून खा.डॉ.हीना गावित,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते श्री.सोनवणे यांचा गौरव करण्यात आला.
मानवी जीवनात चित्रकलेचे अनन्य साधारण महत्व आहे. चित्रकलेमुळेच आजतागायत मानवाने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे. या कलेमुळे आजपर्यंत अनेक कलावंत समृद्धीच्या क्षेत्रावर पोहचले आहेत. असेच एक कलावंत ज्ञानेश्वर सोनवणे यांनी नखचित्रातून भगवद्गीता साकारली आहेे. श्री. सोनवणे साक्री तालुक्यातील तामसवाडी येथील मुळ रहिवासी असून ते शिंदखेडा येथील विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सन २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर नखचित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी श्रीमद् भगवद्गीता साकारण्याचे काम हाती घेतले होते.
भगवद्गीतेतील एकूण ७०० श्लोक म्हणजेच १ हजार ४०० ओळी त्यांनी साकारल्या. दररोज किमान ७ ते ८ आठ तास लिखाण केल्यानंतर त्यांना यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला. साक्री येथील सुर्वे तात्या हे नखचित्रकार होते. त्यांच्याकडून त्यांनी नखचित्रकलेचे शिक्षण घेतले आणि कोरोनाच्या काळात वेळ मिळाल्याने संधीचे सोने करीत थेट भगवद्गीताच नखचित्रकलेतून साकारली. त्यांच्या या अनोख्या कलाकारीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले. यामुळे इंडिया बुक ऑफ द रेकॉर्डने त्यांच्या या कलाकारीची दखल घेत सन्मानित केले आहे. दरम्यान, त्यांच्या या यशाबद्दल खा.डॉ.हिना गावित, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला.यावेळी एस.आर.पाटील, शैलजा पाटील, मीनाक्षी भदाणे, नितीन मंडलिक, प्रल्हाद साळुंखे, राम पाटील आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे युवकाचा धारदार शस्त्राने भोसकले, खूनानंतर संशयित आरोपीने असे केले…

Next Post

ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने ग्रंथपालन वर्ग २०२३ चे उदघाटन

Next Post
ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने ग्रंथपालन वर्ग २०२३ चे उदघाटन

ग्रंथपालन केंद्र नंदुरबार यांचा वतिने ग्रंथपालन वर्ग २०२३ चे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add