नंदुरबार | प्रतिनिधी
नंदूरबार शहरात एकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. खुनात बंदुकीचाही वापर करण्यात आल्याचे समजते. खुनाचे कारण समजू शकलेले नाही मात्र कौटूंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. या प्रकरणी संशयित स्वतः च नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात हजर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार शहरातील उमापती महादेव मंदिर परिसरात काल दिनांक ९ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कृष्णा आप्पा पेंढारकर (वय ४०) यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी बंदुकीचाही वापर करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटनेचे कारण समजू शकलेले नाही.
मात्र, कौटूंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. घटना घडताच संशयित आरोपी स्वतःच नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. मयताचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत सुरु होते. घटनास्थळी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पेालीस उपअधीक्षक सचिन हिरे, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर आदींनी भेट देवून पाहणी केली.