नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील उमापती महादेव मंदिराजवळ आज भर दुपारी एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे .या खून प्रकरणात गोळीबार केल्याचा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृत व्यक्तीचं शरीर जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी एका संशयित आला ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक किरण कुमार खेडकर यांच्यासह पोलीस अधिकारी गुन्हा शोध पथक पोलीस कर्मचारी उपस्थित होते गुन्ह्याचा तपास पोलीस करीत असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.कुष्णा पेंढारकर असे मयताचे नाव सांगण्यात येत आहे.