Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भुजगांव येथे महिला सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण

team by team
April 8, 2023
in Uncategorized
0
भुजगांव येथे महिला सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण
धडगाव l प्रतिनिधी
 तालुक्यातील भुजगाव ग्रामपंचायत अंतर्गत हरणखुरी व भुजगाव गावातील महिलांचे सक्षमीकरण उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यकम संपन्न झाला. यशवर्धिनी ग्रामिण महिला स्वयंसिद्ध संघ,आंबेगाव  जिल्हा पुणे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने प्रशिक्षक म्हणून विरसिंग पावरा, तेगा पावरा  उपस्थित राहिले.
सदर प्रशिक्षणाच्या माध्यमातून गावातील महिलांना बचतगटातुन कुटुंबाचे आर्थिक विकास कसा साध्य करता येईल. महिलांच्या बचतीच्या सवयी, महिलांनी स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्राची पूर्तता कशी करावी आणि कुटंबाचे स्थलांतर झाल्याने अनेक सामाजिक आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत त्यामुळे कुटंबाचे स्थलांतर न करता गावात रोजगार हमी कायदा अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कामाची मागणी कशी करता येते. या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच बचतगटाच्या माध्यमातून उद्योजक तयार झालेल्या महाराष्ट्रातील या महिलांच्या प्रेरणादायी उदाहरणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
प्रसंगी ग्रामपंचायत भुजगाव लोकनियुक्त सरपंच अर्जुन पावरा,उपसरपंच कविता पावरा ग्रामपंचायत सदस ठुमलीबाई पावरा, निशा भील भुजगावचे माजी पोलिस पाटील इंदास पावरा, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप पाडवी,रोजगार सेवक सुभाष पावरा, सामाजिक कार्यकर्ता राकेश पावरा,प्रमोद पावरा तथा मोठ्या संखेने बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या  हरणखुरी व भूजगाव गावातील अंगणवाडीताईंनी पुढाकार घेत कार्यक्रमाचे नियोजन केले.
“ पंचायत समिती प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायत स्तरावर महिला सक्षमीकरण व उद्योजकिय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यशवर्धिनी ग्रामिण महिला स्वयंसिद्ध संघाच्या माध्यमातून गावातील महिलांना अनेक नवीन माहिती त्यांच्या पर्यंत पोहचविण्यात यश आले त्यातून महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल”
अर्जुन पावरा,
लोकयुक्त सरपंच ग्रामपंचायत भूजगाव.
बातमी शेअर करा
Previous Post

चावरा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत यश

Next Post

काकर्दे ग्रामपंचायततर्फे बालकांना साहित्य वाटप

Next Post
काकर्दे ग्रामपंचायततर्फे बालकांना साहित्य वाटप

काकर्दे ग्रामपंचायततर्फे बालकांना साहित्य वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add