म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यातर्फे विविध शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व चावरा इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबारच्या मुले व मुलींनी वेगवेगळ्या स्पर्धेत यश मिळविले.
शालेय जिल्हास्तरीय स्पर्धा 14 17, 19 वर्ष वयोगटात मुले व मुलींच्या स्पर्धा घेण्यात आली. यावेळी टेबल टेनिस स्पर्धेत मुले व मुली 14 व 17 वयोगट विजयी ,जलतरण स्पर्धेत 14 वर्ष वयोगट मुले विजयी, बॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षे वयोगट मुले उपविजयी ,सिकाई मार्शल आर्ट्स स्पर्धेत 14 ,17 वर्ष वयोगटातील मुले व मुली विजयी, बास्केटबॉल स्पर्धेत 14 ,17 वर्ष वयोगटात तील मुले उपविजयी आणि 14 ,17 वर्ष वयोगटात मुली विजयी , फुटबॉल स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुली विजयी, कॅरम स्पर्धेत 14, 17 वर्ष वयोगटातील मुले व मुली विजयी,
लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात मुले विजय ,टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत 14 17 वर्ष मुले विजयी ,तेंग सुडो स्पोर्ट्स कोरियन कराटे स्पर्धेत 14,17, वर्षे वयोगट मुले व मुली विजयी, स्केटिंग स्पर्धेत 11,14 वर्ष वयोगट मुले मुली विजयी. या सर्व विविध क्रीडा प्रकारात विजयी स्पर्धकांचे जवळ जवळ 180 विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर झालेल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ.दिनेश बैसाणे, क्रीडा शिक्षक हर्षबोध बैसाणे,व शाळेचे मुख्याध्यापक फादर टेनी फरक्का , उपमुख्याध्यापक फादर सीजन व जनरल कॉर्डिनेटर सिस्टर आनु यांच्या शुभहस्ते सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले व सर्व खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.









