म्हसावद l प्रतिनिधी
डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा जळखे ता. जि. नंदुरबार येथे आज आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला. आश्रमशाळेत प्राथमिक व माध्यमिक असे दोन विभाग आहेत. आज पर्यंत इ.10च्या विध्यार्थ्याचाच निरोप समारंभ होत होता. परंतु यावर्षी इ.7 वी चा निरोप समारंभ घेण्यात आला.
इयत्ता सातवीचे विध्यार्थी व त्यांच्या वर्गशिक्षकांनी हा कार्यक्रम घडवून आणला. विध्यार्थ्यानी इ.7वी च्या वर्गाला भेटवस्तू दिली. कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रविणकुमार सोनवणे यांनी पुढील वर्षी आपले स्वागत नक्की करू असे सांगितले तर प्राथमिक चे मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी यांनी माध्यमिक शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठीआश्रमशाळेच्या सर्व विकास सहयोगीनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन अनिल रौंदळ यांनी केले होते. यावेळी प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी व माध्यमिक मुख्याध्यापक प्रविण सोनवणे इतर विकास सहयोगी उपस्थित होते.









