म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे दरवर्षी 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात येत असते त्या अनुषंगाने अध्यक्ष गौतम अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यात जयंती उत्सव समितीची नियुक्ती करण्यात आली समितीचे अध्यक्ष म्हणून विक्रांत गौतम अहिरे तर उपाध्यक्ष शुभम महेंद्र आगळे यांची नियुक्ती निवड करण्यात आली.तर खजिनदार हेमंत महेंद्रे,सचिवपदी ऋषिकेश वाघ,सल्लागार बुध्दभूषण संजय जाधव तर सदस्य सिद्धार्थ पिंपळे,तुषार बैसाणे,राज अहिरे,निलेश गवळे,यश जाधव,कार्तीक पिंपळे,देवेंद्र अहिरे,सनी गवळे,पवन बैसाणे, कुणाल अहिरे,विशाल सावंत,रोहित अहिरे यांची निवड करण्यात आली.
या बैठकीत चुनीलाल अहिरे,निबा बागले,महेंद्र आगळे,नरेश गवळे,पुलायन जाधव,रविंद्र कुवर,दिलीप आगळे,रमाकांत अहिरे,छोटूलाल बैसाणे,सुपडू अहिरे,आबा बैसाणे,गौतम बागले,अनिल बेडसे,कैलास अहिरे व समाजाचे नागरिक,तरुण मंडळी उपस्थित होते.









