Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील सहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
April 8, 2023
in क्राईम
0
नंदूरबार येथील सहा अवैध सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार । प्रतिनिधी

नंदूरबार येथे व्याजाचे पैसे देवूनही वेळोवेळी जादा पैशांची मागणी करून त्रास देणाऱ्या सहा अवैध सावकारांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नंदूरबार शहरातील रा.जयहिंद कॉलनीत राहणाऱ्या कोमल राम नाथानी यांचे पती राम मोहनदास नथानी यांना एक वर्षापुर्वी सुनिल बाबुराव पाटील रा. शाहुनगर नंदुरबार यांच्याकडून 2 लाख रुपये 1500 रुपये रोज या दराने, मोहन सोमा सोनवणे रा. मिशन शाळेजवळ सिंधी कॉलनी नंदुरबार यांच्याकडून 2 लाख रुपये 1200 रोज दराने, सावंत सोनवणे रा. मिशन शाळे जवळ नंदुरबार यांच्याकडून 15 हजार रुपये, कैलास सोनवणे रा. मिशन शाळे जवळ नंदुरबार यांच्याकडून

20 हजार रुपये, मनोज चौधरी रा. नंदुरबार यांच्याकडून 35 हजार रुपये, मनोज आव्हिडे रा. सुरत यांच्याकडुन 30 हजार रुपये व्याजाने व बाकी लोकांकडुन 5 टक्के व्याजाने घेतले होते.त्याबदल्यात सुनिल बाबुलराव पाटील यास दोन आयडीबीआय, एचडीएफसी बँकेचे सहया केले कोरे चेक व मोहन सोमा सोनवणे याला सहया केलेले 4 कोरे चेक तसेच 100 रुपयांचे कोमल नाथानी व राम नाथानी यांचे सहया केले कोरे स्टॅम्प दिले. तसेच कोमल नाथानी यांची वहिनी पुजा गुरुमख कोटवाणी रा.यवतमाळ यांच्या बँकेच्या खात्यातून सुनील पाटील व मोहन सोनवणे यांना प्रत्येकी 1 लाख रुपये दिले.

तसेच सर्वांना त्यांचे पैसे व संपूर्ण व्याज दिले आहे. तरीदेखील नाथानी दाम्पत्याला वेळोवेळी त्यांच्या घरी येवून पैशांची व व्याजाची मागणी करुन दमदाटी करण्यात येत होती.तसेच फोनवरही पैशांची व व्याजाची मागणी करुन दमदाटी केली. सदर घटना दि.29 ऑक्टोबर 2022 ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत घडली.

याबाबत सौ.कोमल नाथानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उपनगर पोलीस ठाण्यात सुनील बाबुराव पाटील, मोहन सोमा सोनवणे, सावंत सोनवणे, कैलास सोनवणे, मनोज चौधरी, मनोज आव्हिडे यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 452, 341, 504, 506, 507, 34, सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 2 व 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कोळी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

थुवानी येथे गरिब कुटुंबाचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

Next Post

५० हजार ग्राहकांनी वीजबिल भरले,  ऑनलाईन घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

Next Post
५० हजार ग्राहकांनी वीजबिल भरले,  ऑनलाईन घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

५० हजार ग्राहकांनी वीजबिल भरले,  ऑनलाईन घरबसल्या वीजबिल भरण्याकडे वाढता कल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add