Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विभागीय नको,केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करा: बिरसा फायटर्सचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन

team by team
April 7, 2023
in राजकीय
0
विभागीय नको,केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करा: बिरसा फायटर्सचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन

म्हसावद l प्रतिनिधी

केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करावी,विभागीय पद्धतीने भरती करू नये,अशी मागणी गणेश खर्डे राज्य उपाध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन जलिंदर पावरा प्रसिध्दी प्रमुख नंदुरबार जिल्हा बिरसा फायटर्स यांनी ही दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,राज्यात सध्या तब्बल 34 हजार जागांवर शिक्षक भरती प्रस्तावित आहे.पुढील शैक्षणिक वर्ष 2023-2024 सुरू होण्यासाठी ही शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.मात्र याचवेळी शिक्षणमंत्र्यांनी विभागीय शिक्षक भरती ही विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे.यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणा-या राज्यातील उमेदवारांवर अन्याय होणार आहे.म्हणून डी.एड.व बीएड धारक उमेदवारांनी विभागीय शिक्षक भरतीवर आक्षेप घेतला आहे.

विभागीय शिक्षक भरतीमुळे विभागातील शिक्षकांवर आणि विभागावर अन्याय होणार आहे.त्यामुळे 2017 च्या शासन निर्णयानुसार केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती व्हावी.शिक्षकांच्या सर्वाधिक जागा कोकण विभागात असल्यामुळे विभागीय शिक्षक भरती व्हावी ,म्हणून कोकणात काही संघटनांद्वारे आंदोलने सुरू आहेत. विभागीय शिक्षक भरतीचा निर्णय कायदेशीररित्या आणि नैतिकदृष्ट्या उचित नाही.तसेच विभागीय शिक्षक भरती प्रक्रिया ही अखंड महाराष्ट्राच्या एकतेला बाधक ठरू शकते.

विभागीय शिक्षक भरती करून भरतीत साथानिकांनाच प्राधान्य द्यावे,न्याय द्यावा,अशी मागणी करत कोकणात आंदोलने सुरू आहेत. मात्र ही आंदोलने बेकायदा,टेट पात्र असूनही उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत अडथळा आणणे,हा आंदोलनाचा उद्धेश असू शकतो.त्यामुळे विभागीय पद्धती बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांचा विचार करून केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे दगडफेक प्रकरणी दोघांना अटक,२८ जणांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी

Next Post

नंदूरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रम

Next Post
नंदूरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रम

नंदूरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्च मध्ये गुड फ्रायडे निमित्त विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add