नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दगडफेक प्रकरणी आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली असून संशयित आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात दि.४ एप्रिल रोजी रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास दगडफेक प्रकरणी २८ जणांना अटक करण्यात आली होती.दुसऱ्या दिवशी दोन आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. अटक झालेल्या आरोपींची संख्या ३० वर पोहोचली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी पुन्हा या भागात पहाणी केली. आंतरधर्मिय विवाहातून दगडफेकीची घटना घडली होती.जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक किरणकुमार पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस स्वप्नील पगारे हे जखमी झाले असून सर्व पोलिस अधिकारी तात्काळ सेवेत रूजू झाले आहेत. दुसऱ्या दिवशी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच शहरात पूर्णपणे शांतता आहे.









