नंदुरबार l प्रतिनिधी

नवापूर शहरातील ऑईल फॅक्टरीत सुमारे सव्वादोन लाख रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर शहरातील इंद्रिस रज्जाक खाटीक याची इस्त्राईल ऑईल फॅक्टरी आहे. सदर ऑईल फॅक्टरीत त्यांनी मागील २६ महिन्यामध्ये एकूण २ लाख ३१ हजार ६४० रुपये किंमतीची ११०६४३ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले.
याबाबत नंदुरबार महावितरण कंपनीचे भरारी पथकातील अतिरीक्त कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात इंद्रिस रज्जाक खाटीक यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









