नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात काल रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास तुफान दगडफेक झाल्याची घटना असून या दंगलीत काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.
रात्री पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला असून जुन्या वादातून तुफान दगडफेक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान दंगलीत 2 अधिकाऱ्यांसह 2 ते 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात जुन्या वादातून तूफान दगडफेक झाली असून मोटर सायकलची जाळपोळ करण्यात आली आहे.
तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून धरपकड सुरू होती. जवळपास 15 ते 20 संशयतांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात पूर्ण शांतता आहे.शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी परिसरात जाऊन पाहणी केली. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.









