Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

team by team
April 3, 2023
in राजकीय
0
अक्कलकुवा येथे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
अक्कलकुवा l  प्रतिनिधी
  जैन समाजाचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांचा 2622वा जन्म कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. या निमत्ताने श्री सकल जैन समाज अक्कलकुवाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
प.पू.खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसुरिश्वरजी म.सा. यांचा आज्ञानुवर्तिनी गच्छगणनी  प.पू.साध्वी श्री सुलोचनाश्रीजी म.सा. यांचा शिष्या प.पू. साध्वी श्री प्रिय स्नेहांजनाश्रीजी म.सा. आदीं ठाणा 4 यांचा पावन निश्रेत यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 यात विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले यात  भगवान महावीर यांचावर आधारित गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, प्रश्नोत्तरी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पालना सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम द्वितीय व तृतीय येणाऱ्याना विशेष पारितोषिक देण्यात आले.
  3 मार्च रोजी सकाळी 8 वाजेला श्री. वासुपूज्यस्वामी स्वामी जिनमंदिर येथून शोभा यात्रा काढण्यात आली. शोभायात्रा शहरातील मुख्य मार्गाने हनुमान चौक, झेंडा चौक, फेमस चौक, मुख्य बाजार चौक, तलोदा नाका, महामार्ग, भंसाली चौक, आगीवाल चौक, झेंडा चौक, हनुमान चौक, जैन धर्मशाला होत जैन मंदिर येथे शोभायात्राची सांगता करण्यात आली.
शोभायात्रेत भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट, घोड्यावर बसून जैन ध्वज हातात घेऊन लहान मुले,  असलेल्या सुशोभित पालकी ढोल, ताशा सह वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली. अहिंसा परमो धर्म, वंदे विरम, भगवान महावीर स्वामी की जय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सदर शोभायात्रेचा जैन आराधना भवन येथे धार्मिक सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी प.पू.साध्वी श्री प्रिय स्नेहांजनाश्रीजी म.सा. यांनी भगवान महावीर स्वामी यांचा जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
 यावेळी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जैन स्थानक येथे आयोजन करण्यात आले .यात 60 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले .तसेच यावेळी स्वामी वात्सल्याने आयोजन जैन धर्मशाला येथे करण्यात आले होते.तसेच दुपारी खापर येथील गौशाला येथे जीवदया कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी जैन समाज बांधव, महिला, युवा वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
जगाला अहिंसेचा मार्ग दाखवून मानवी जीवन समृध्द करणारे भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक महोत्सव अक्कलकुवा शहरात अभूतपूर्व उत्साहात यंदा साजरी करण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार दिगंबर जैन समूहातर्फे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

Next Post

बालवाडीत शिकणारी माहेरुनचा पहिला रोजा

Next Post
बालवाडीत शिकणारी माहेरुनचा पहिला रोजा

बालवाडीत शिकणारी माहेरुनचा पहिला रोजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

शिवदर्शन विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती शिबिर

July 27, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

आषाढी एकादशी निमित्त वारकरी संस्कृतीचा अनोखा जागर

July 27, 2026
सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा

July 27, 2026
पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

पाण्याच्या मोटारी चोरणारा सराईत चोरटा जेरबंद; चोरीच्या सात मोटारी हस्तगत

July 27, 2026
शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add