नंदूरबार l प्रतिनिधी
आज दि.२ एप्रिल रोजी काकाजी मंगल कार्यालय शिंदखेडा येथे दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्यात महाविकास आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. व महाविकास आघाडीच्या वतीने ही निवडणूक लढवून दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे या हेतूने आजचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता.
सदर मेळाव्यात महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आपापली मते मांडलीत. यावेळी माजी मंत्री हेमंत देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंतराव साळूंके, माजी आमदार रामकृष्ण पाटील , राष्ट्रवादी माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, माजी सभापती विठ्ठलसिंग गिरासे, जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे, शिवसेनेचे शानाभाऊ सोनवणे,पं.स.सदस्य राजु देवरे, मंगेश पवार, सर्जेराव आप्पा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, माजी संचालक प्रकाश पाटील, जि.प.सदस्य ललित वारूडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष डॉ.कैलास ठाकरे, शिवसेना तालुकाध्यक्ष गिरीश देसले,माजी जि.प.सदस्य हेमराज पाटील, प्रमोद सिसोदे, साहेबराव खरकार, आधार पाटील, विश्वनाथ पाटील, डॉ. भरत राजपुत, सुनिल चौधरी आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर मेळाव्याचे नियोजन महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य ललित वारुळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष गिरीश देसले आदींनी केले होते.