Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली वैद्यकीय महाविद्यालयास भेट, चांगले डॉक्टर बनुन रुग्णांची सेवा करण्याचे केले आवाहन

team by team
April 2, 2023
in राजकीय
0
पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिली वैद्यकीय महाविद्यालयास भेट, चांगले डॉक्टर बनुन रुग्णांची सेवा करण्याचे केले आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. या भेटीदरम्यान भावी डॉक्टरांना चांगले डॉक्टर बनुन रुग्णांची सेवा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणे हे माझे स्वप्न होते. त्यासाठी मी २०१२ पासून प्रयत्न केले ते स्वप्न आज पुर्ण झाले असून नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा असून या भागातील बहूतांश रूग्णांमध्ये सिकलसेल, कुपोषण व रक्त संबंधीत तसेच विविध दुर्धर आजाराचे रुग्ण आपणास दिसून येतील. त्यामुळे या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण व रुग्णसेवा देत असतांना आपणांस वैद्यकीय संशोधनाचा अनुभव मिळेल व आपल्या वैद्यकीय ज्ञानात अधिक भर पडुन आपण चांगले डॉक्टर व्हा व रुग्णसेवा करा,असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.

जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विद्यार्थ्यांचाही पालक असुन विद्यार्थ्यांच्या व संस्थेच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारीही माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते एम.बी.बी.एस. परीक्षेचा 100 टक्के निकाल लागल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळालेले विद्यार्थी महोम्मद शेख, भक्तिसिंग व अनुजका तडकसे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राध्यापक शल्यचिकीत्साशास्त्र डॉ. तुषार पाटील यांना रुग्णालयीन प्रशासनाच्या कामासाठी उपअधिष्ठाता तर सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेश बोरसे यांना बधिरीकरणशास्त्र वैद्यकीय अधिकृषक म्हणून नियुक्ती दिल्यामुळे त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉ तुषार पाटील, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रविणकुमार ठाकरे, डॉ. योगेश बोरसे, डॉ.संतोष पवार, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमाले किनगे, डॉ. सुधाकर बंटेवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन द्वितीय वर्षातील विद्यार्थी हर्षल केदारे यांनी केले. प्रारंभी त्यांनी महिला रुग्णालय तसेच आयुष रुग्णालयातील द्वितीय वर्षांच्या प्रयोगशाळा विभागाची पाहणी केली.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्युत तारेची चोरी करणाऱ्यास नवापूर पोलीसांनी केली अटक

Next Post

दोंडाईचा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा बैठकीत निर्धार

Next Post
दोंडाईचा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा बैठकीत निर्धार

दोंडाईचा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा बैठकीत निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add