नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथे ऊसनवार पैसे सकाळी देतो असे सांगितल्याच्या रागातून एकास दगडानेे मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे
नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे येथील परमेश्वर उर्फ सोनू छगन पवार यांना सुभाष विजयसिंग राजपूत यांच्या आईने २ हजार रुपये ऊसनवार दिले होते. सदर २ हजार रुपये परमेश्वर राजपूत यांनी परत मागितले असता सुभाष राजपूत यांनी सकाळी पैसे देतो असे सांगितले. याच राग आल्याने परमेश्वर पवार यांना दगडाने सुभाष राजपूत यानंा बरगड्यावर, काखेत, पाठीवर मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत सुभाष राजपूत यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात परमेश्वर पवार याच्याविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.ज्ञानेश्वर सामुद्रे करीत आहेत.








