नंदूरबार l प्रतिनिधी
शहरातील सरदार चौकातील एका घरात नवापूर पोलीसानी छापा टाकून घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर बेकायदेशीर आढळून आले. सोबतच वाहनात गॅस भरण्यासाठीचे युनिट, 2 मोटरी, एक वजन काटा आधुनिक साहित्य पोलिसांना मिळून आले. या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशीरा पर्यंत सुरू होती.
इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने अनेक वाहन चालक कमी दरात घरगुती गॅस व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनात धोकेदायक पद्धतीने गॅस सिलेंडर भरण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती पोलीसांना मिळाल्याने काल संध्याकाळी सात वाजता कारवाई करण्यात आली आहे.
वाहनात अवैधरित्या गॅस सिलेंडर भरण्यासाठी घरातील 40 विविध कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले.नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. सहिद उर्फ लल्ला काथावाला याने अवैधरित्या विनापरवाना घरगुती गॅस सिलेंडर स्वत:च्या फायद्यासाठी धोकादायक पद्धतीने वाहनांमध्ये गॅस सिलेंडर भरण्याचा हेतू बाळगल्या प्रकरणी नवापूर पोलिसांनी कारवाई केली आहे.
संबंधित व्यक्ती पोलीस आल्याने घटनास्थळावरून फरार झाला असून नवापूर पोलीस त्याच्या शोध घेत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी ही कारवाई केली. यात विविध कंपन्यांचे 40 घरगुती व व्यावसायिक वापराचे गॅस सिलेंडर मिळून आले. साठवणूकीबाबत गॅस सिलेंडरचा परवाना संशयित आरोपीकडे नसल्याचे आढळून आले. सहिद उर्फ लल्ला काथावाला विरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नवापूर पोलीस व नवापूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने ही संयुक्त कारवाई केली आहे.
नवापूर पोलिसांना सरदार चौकात एकूण 40 गॅस सिलेंडर मिळून आले यात 29 घरगुती गॅस सिलेंडर मध्ये 20 सिलेंडर रिकामे भरलेले आढळून आले. 11 व्यावसायिक गॅस सिलेंडर मध्ये तीन भरलेले आठ रिकामे गॅस सिलेंडर आढळून आले. 40 गॅस सिलेंडर पैकी इंडेन गॅस कंपनीचे 35 नग व भारत गॅस कंपनीचे चे 05 नग गॅस सिलेंडर नवापूर पोलीसांनी जप्त केले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर कुठून आले हा देखील संशोधनाचा विषय आहे.नवापूर शहरात घरगुती गॅस सिलेंडर व व्यावसायिक गॅस सिलेंडरचा गैरवापर सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात नवापूर पोलीस व पुरवठा विभागाने सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.








