Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

team by team
March 26, 2023
in राजकीय
0
माजी आ.चंद्रकांत रघुवंशींनी फुंकले बाजार समिती निवडणुकीचे रणशिंग

नंदुरबार |  प्रतिनिधी

माजी आमदार तथा धुळे-नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीचे रणशिंग फुंकलेले आहे. कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेच्या झेंडा फडकवण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

 

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीबी गार्डनच्या डोममध्ये माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या रविवारी मेळावा घेण्यात आला. मेळाव्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉ.सयाजीराव मोरे यांनी केले. यावेळी माजी आ. चंद्रकांत म्हणाले, जनतेच्या विश्वासावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत.सध्या विकास सोसायटीमध्ये ३०० सभासद जास्त असल्याने तेच मतदार बाजार समितीच्या ११ सदस्यांना निवडून आणणार आहेत. मागील पंचवार्षिक मध्ये विरोधी गटाचे २ उमेदवार निवडून आले होते. यावेळी व्यापारी गटातून दोन्ही उमेदवार देखील शिवसेनेचे निवडून येतील. निवडणुकीची भीती नसून कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणुका लढवायच्या आहेत. उमेदवार देतांना कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी निश्चित करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रयत्नांची पराकाष्टा करायची आहे.

 

 

 

नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात कांद्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कांद्याचे खरेदी केंद्र सुरू करावे अशी इच्छा होती. परंतु, ते दुर्दैवाने झाले नाही. यंदा कोणत्याही परिस्थितीमध्ये कांद्याच्या लिलाव सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले. शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल मदत करण्याच्या निर्णय घेतलेला आहे.शिंदे गटाच्या शिवसेनेचे सदस्य नंदुरबार तालुक्यात जास्त निवडून आल्याने ग्रामपंचायतींना निधीची  मागणी केली होती. मागणीची दखल घेत राज्य शासनाकडून ग्रामपंचायतीला ३० लाखाच्या निधी प्राप्त झाल्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.

 

 

 

 

 

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यकर्त्यांना विविध आमिषे दाखवण्यात येतील. त्या आमिशांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये. सर्व कार्यकर्त्यांनी संघटित होऊन शिवसेनेच्या झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख ऍड.राम रघुवंशी यांनी केले.यावेळी माजी जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील पुन्हा रघुवंशी गटात दाखल तर राष्ट्रवादीला रामराम ठोकत नितीन जगताप यांच्या शिवसेनेत प्रवेश मेळाव्यात ३ हजार पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मेळाव्यात जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील, जि.प सदस्य देवमन पवार,माजी सभापती विक्रमसिंग वळवी, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे यांनी मनोगत व्यक्तकेले. सूत्रसंचालन शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

गावाचा विकास लोकसहभागातूनच होऊ शकतो: भास्करराव पेरे पाटील

Next Post

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Next Post
शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

शिंदे-फडणवीस सरकार संवेदनहिन, शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष :राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add