Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील वैद्यकीय सेवेसाठी आ.आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी

team by team
March 23, 2023
in राजकीय
0
तोरणमाळ येथील पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधेसाठी अतिरिक्त निधी द्या : आ.आमश्या पाडवी 

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यासह महाराष्ट्रातील १६ आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त जिल्ह्यातील कार्यरत भरारी (२८१) पथकाचे  मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा विशेष बाब म्हणुन नियमित करण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी आमदार आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे एका पत्राद्वारे केली आहे.
          याबाबत आ.आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे की,नंदुरबार जिल्ह्या सह राज्यातील १६ आदिवासी अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात नवसंजीवनी योजने अंतर्गत गेल्या २० वर्षापासून मानसेवी वैद्यकीय अधिकारी अल्प मानधनावर अहोरात्र आरोग्य सेवा देत आहेत. कोविड-१९ च्या महामारीमध्ये देखील प्राधान्याने त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.
आरोग्य सेवेचे आयुक्त यांनी मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांचा समावेशनाचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. आरोग्य विभागात जवळपास ४०० गट-ब वैद्यकीय अधिकारी यांची पदे रिक्त आहेत. याबाबत शासनाने दखल घेवून आदिवासी भागात गेल्या १५ ते २० वर्षापासून अल्पमानधनावर वैद्यकीय सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी गट-ब संवत रिक्त पदावर विशेष बाब म्हणून मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे (भरारी पथक) सेवासमावेशन करण्याबाबत आदेश व्हावेत यासाठी संबंधित मंत्री, सचिव व अधिकारी यांची आपल्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक लावून मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांना न्याय मिळवून दयावा अशी मागणी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार आमश्या पाडवी यांनी केली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूरात भरत गावितांच्या हस्ते ‘आनंदाचा शिधा वाटप

Next Post

वीज चोरी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

Next Post
तलावडी येथे दुचाकींच्या धडकेत दोघांना दुखापत

वीज चोरी प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add