Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोठ्ठी बातमी : सोने, चांदीचे कण मिश्रीत माती चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी झाली जेरबंद, ११ लाखाचा मुद्देमाल जप्त

team by team
March 22, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदूरबार येथून सोने, चांदीचे कण मिश्रीत माती चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या असून 10 लाख 39 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 26 मार्च रोजी सकाळी 11 वा. सुमारास यज्ञेश महेश सोनी रा. प्लॉट नंबर 17-2ब, वृंदावन कॉलनी, नंदुरबार यांचे नंदुरबार शहरातील शहीद शिरीष मेहता रोड, असोदेकर वाडा, जनक आभुषणच्या मागे असलेले श्रीजी दिपज्योती डाय कटर्स दुकानात त्यांचे वडील महेश् कांतीलाल सोनी हे दुकानात एकटेच असतांना त्यांना बोलण्यात गुंतवून अनोळखी चार इसमांनी 3 लाख 50 हजार रुपये किमतीची 5 ते 6 किलो वजनाची सोनेमिश्रीत माती चोरुन नेली म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 379,34 प्रमाणे 4 संशयित आरोपीतांविरुद् दाखल आहे.

 

 

याबाबत 21 मार्च रोजी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीजी दिपज्योती डाय कटर्स या दुकानातून सोनेमिश्रीत माती चोरुन नेणारे संशयीत इसम हे मारुती सुझुकी इटींगा वाहन ( क्र. GJ-03 LG-0907) हिच्याने धुळेकडून नंदुरबारमार्गे गुजरात राज्यातील राजकोट येथे जाणार आहे अशी बातमी मिळाली. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील अंमलदारांना सदरची माहिती सांगून संशयीतांना ताब्यात घेवून विचारपुस करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले.

 

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली येथे बॅरीकेटींग लावून वाहनांची तपासणी करीत असतांना 22 मार्च रोजी रात्री १ वाजे दरम्यान एक पांढऱ्या रंगाची इर्टीगा (क्र. GJ-03 LG-0907) धुळेकडून येवून नाकाबंदीच्या ठिकाणी थांबली. वाहनातील इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता गाडी चालविणाऱ्या इसमाने त्याचे नाव विजय करसनभाई गोहील रा. चुनारवाड, माजेवाडी दरवाजा, जुनागड पुढील सीटवर त्याचे बाजूला बसलेल्या इसमाने त्याचे नाव प्रविण भिकुभाई दोडीया रा. चुनारवाड, स्ट्रीट नंबर-2, आजी नदीच्या काठी, मफातीयापरा, भावनगर रोड, राजकोट ह.मु सापर, शांतीधाम सोसायटी, गोंडल चौफुली जवळ, राजकोट तर मागील सीटवर बसलेल्या इसमांनी त्यांचे नाव विजयभाई जीवनभाई सोलंकी रा. चुनारवाड-1, नदीका काँटा विस्तार, लखाजीराज, उद्योग नगर, भावनगर रोड, राजकोट, जयदीप धिरुभाई चौहान रा. गल्ली नंबर-5 वेलनाथ सोसायटी, कोठारीया रोड, राजकोट असे सांगितले.

 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांना विचारपूस केली असता ते उडवा उडवी उत्तरे देवू लागल्याने वाहनाची तपासणी केली असता गाडीच्या मागच्या सीटवर एक काळ्या रंगाची पिशवी आढळून आली. पिशवी उघडून पाहणी केली असता त्यात काळसर माती सोने, चांदीचे कण मिश्रीत आढळून आली, म्हणून 4 लाख रुपये किमतीची 8.388 किलो ग्रॅम वजनाची सोने, चांदीचे कणमिश्रीत माती, 31 हजार रुपये किमतीचे 4 मोबाईल, 8 हजार 200 रुपये रोख, 6 लाख रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची मारुती इटींगा गाडी (नं. GJ-03 LG-0907) व इतर मुद्देमाल असा एकुण 10 लाख 39 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर कारवाई करुन जप्त करण्यात आला असून ताब्यात घेण्यात आलेले संशयीत आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे

 

 

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत आरोपीतांनी महाराष्ट्रात व इतर कोणत्या राज्यात अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत का ? याबाबत सकोल तपास करण्यात येत आहे असे पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.

 

 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक राकेश मोरे, तुषार पाटील, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार किरण मोरे, राजेंद्र काटके, अभय राजपूत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गरीब, कष्टकऱ्यांचा सणातील आनंद द्विगुणित करण्यासाठी आनंदाचा शिधा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

Next Post

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

Next Post
महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add