Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गरीब, कष्टकऱ्यांचा सणातील आनंद द्विगुणित करण्यासाठी आनंदाचा शिधा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
March 22, 2023
in राजकीय
0
गरीब, कष्टकऱ्यांचा सणातील आनंद द्विगुणित करण्यासाठी आनंदाचा शिधा : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित
नंदुरबार l प्रतिनिधी
गरीब,कष्टकरी, शेतकऱ्यांचा सणांचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी शासनामार्फत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी केले.
आज नंदुरबार व चौपाळे येथे गुढीपाडव्यानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी. जि.प.सदस्य सागर तांबोळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, सरपंच नामदेव भिल (चौपाळे ) आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सणानिमित्त “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षांपासून वितरीत करण्यात येणार आहे. शासन वेगवेगळया योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांना मदत करत आहे. नुकतेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत वाढ केली आहे. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरु केली असून या योजनेतंर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात आली असून या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलासाठी लवकर स्वतंत्र महिला धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुर्वी खेड्यापाड्यात महिलांना दूरवर पाणी घेण्यासाठी जावे लागत होते. परंतू जल जीवन मिशनच्या माध्यमातुन प्रत्येक घरात पाणी देण्यात येत आहे. शासन महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवित असून या योजनेचा लाभा घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खासदार डॉ.हिना गावित म्हणाल्या की, गुढीपाढवा व आगामी येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण गोरगरीबांना आनंदाने साजरे करता यावे या सण उत्सवांच्या काळात गोरगरीबांना गोड करता यावे यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनामार्फत गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून  मोफत अन्न धान्य देण्यात येत असून  हे कोरोना काळापुरताच मर्यादित  न ठेवता जोपर्यंत गोरगरीबांचे कोरोनाकाळातील संकट दूर होत नाही तोपर्यंत गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन धान्य देणार येणार आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.
असा असेल “आनंदाचा शिधा”
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस देण्यात येणार आहे. हा “आनंदाचा शिधा” गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून ई-पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात जावून दिवाळीपूर्वी जाऊन ई-पास मशीनवर आपला अंगठा प्रमाणित करुन शिधाजिन्नस संच प्राप्त करुन घ्यावे.
बातमी शेअर करा
Previous Post

युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून दोन दिवसात भरपाईची घोषणा करणार : कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Next Post

मोठ्ठी बातमी : सोने, चांदीचे कण मिश्रीत माती चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी झाली जेरबंद, ११ लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

मोठ्ठी बातमी : सोने, चांदीचे कण मिश्रीत माती चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी झाली जेरबंद, ११ लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add