Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.ची सभा : धडगांव पं. स.च्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी नागरीकांनी अतिक्रमण, अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी गॅस सिलेंडर द्या : भरत गावीत

team by team
March 22, 2023
in राजकीय
0
जि.प.ची सभा : धडगांव पं. स.च्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी नागरीकांनी अतिक्रमण, अंगणवाड्यांना पोषण आहारासाठी गॅस सिलेंडर द्या : भरत गावीत

नंदुरबार| प्रतिनिधी

धडगांव पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी नागरीकांनी अतिक्रमण केले असून गेल्या दोन वषार्ंपासून यावर मागणी करूनही काही कारवाई होत नसल्याने जि.प.च्या स्थायी सभेत जि.प.सदस्यांनी नाराजी व्यक्त करत  याबाबत ठोस कारवाई करण्याची मागणी केली.

नंदुरबार येथील याहामोगी सभागृहात जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी महिला बालकल्याण सभापती संगिता गावीत, हेमलता शितोळे, गणेश पराडके अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी धडगांव येथील पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांसाठी बांधण्यात आलेल्या निवास्थान परिसरात काही नागरीकांनी अतिक्रमण केल्याचे सांगत गेल्या दोन वर्षापासून हा विषय लावून धरला असला तरी यावर कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्या नागरीकांनी कब्जा केला आहे तर त्यांना नोटीस का देत नाही असा सवाल उपस्थित केला. यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी यावेळी सांगितले की, आमच्या काळाततरी अधिकारी तीथपर्यंत पोहोचले. याबाबत संबंधित विभागाने त्याठिकाणी जावून योग्य कारवाई करण्याचा सूचना त्यांनी दिल्या. जि.प.सदस्य भरत गावीत यांनी यावेळी शहादा प्रकल्पात १०६ व रनाळा प्रकल्पात ९० अंगणवाडया या नॉनटिएसपीमध्ये येतात. याठिकाणी बालकांना अन्न शिजवण्यासाठी चुलीचा आसरा घ्यावा लागतो. ग्रामपंचायतीला मिळणार्‍या १० टक्यातील निधीतून या १९६ अंगणवाडयांना गॅस सिलेंडर  देण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली.

विविध विषय समित्यांचा आढावा घेत जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी वर्गखोल्यांबाबत माहिती मागितली असता २८ मधून २५ वर्ग खोल्यांचे काम होणार असल्याचे सांगत ई टेंडर झाले आहे. असे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सांगितले तसेच जि.प.सदस्य विजयसिंग पराडके यांनी जुने धडगांव येथील जि.प.च्या शाळेत २० वर्ग खोल्या आवश्यक आहेत. त्यांना कधी मंजूरी मिळेल. असा सवाल केला. त्यावेळी जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांनी या वर्ग खोल्यांना निधी जास्त असल्याने मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

यावेळी विविध विषयांना मंजूरी देण्यात आली. तसेच आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमातून निधी आयोगाकडील मंजूर निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी व अक्कलकुवा या तालुक्यातील ७० अंगणवाडी केंद्राना सोलर पॉवर पॅकसह दोन फॅन, तीन टयुब लाईल व टिव्ही संच बसविणे या योजनेचा ई निविदा स्विकृतीस मंजूरी देण्यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

जातीचे दाखले वेळेत देण्यासाठी नियम करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

प्रधानमंत्री पीक विमा योजना : सुरक्षित पीक, सुखी शेतकरी

Next Post
प्रधानमंत्री पीक विमा योजना : सुरक्षित पीक, सुखी शेतकरी

प्रधानमंत्री पीक विमा योजना : सुरक्षित पीक, सुखी शेतकरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add