नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथील भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भव्य प्रवेश समारंभ संपन्न झाला.
यावेळी काँग्रेस पक्षातील तळोदा शहराचे माजी नगराध्यक्ष भरतभाई माळी, लक्ष्मण माळी, संजय माळी,माजी नगरसेवक जितेंद्र सुर्यवंशी,साक्री येथील काँग्रेस पक्षातील महिला आघाडी अध्यक्षा सौ. कविताताई क्षीरसागर ,यांच्या सह साक्री व तळोदा शहरातील अनेक प्रमुख पदाधिकारी,माजी नगरसेवक,सभापती व शेकडो कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या मार्फत भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी प्रदेश महामंत्री माधवीताई नाईक,प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील,माजी मंत्री तथा आ.अमरिशभाई पटेल,आ.राजेश पाडवी नंदुरबार जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी,तळोदा येथील नगरसेवक योगेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








