नंदूरबार l प्रतिनिधी
हिंदु नववर्षाचा पूर्व संध्येला तळोदा काँग्रेसचे दिग्गज नेते माजी नगराध्यक्ष भरत माळी यांच्यासह त्यांचा मोठा गट मुंबई येथे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश करत आहे.
अनेक दिवसापासून भरत माळी गटाचा प्रवेशबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. या प्रवेश बाबत माजी स्वीकृत नगरसेवक जितेंद्र माळी यांनी दुजोरा दिला आहे. तळोदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी नगरअध्यक्ष भरत माळी. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक संजय माळी युवा काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष व माजी स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांच्यासह १६० कार्यकर्ते भाजपात आज प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे तसेच संपर्क महा मंत्री विजय चौधरी माजी मंत्री अमरीश भाई पटेल तसेच आमदार राजेश पाडवी यांचा प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे हा प्रवेश सोहळा दुपारी पार पडणार आहे.
भरत भाई गटाचा भाजप प्रवेशामुळे तळोदा शहर काँग्रेस पूर्णतः संपण्याचा स्थितीत गेली आहे. मागील ३५ वर्षा पासून तळोदा तालुक्यात काँग्रस पक्षाचे काम भरत माळी करत होते . भाजपचेचे प्रमुख विरोधी गट म्हणून त्याची ओळख होती. आता मात्र त्यांचा भाजप प्रवेशामुळे शहरातील मुख्यतः पालिकेचे राजकीय गणित बदलणार आहेत. भरत माळी यांच्या प्रवेशामुळे भाजपचा गट अधिकच मजबूत स्थितीत दिसणार आहे.
भरत माळी यांचा राजकीय प्रवास –
तळोदा शहराच राजकारणात मागील ४० वर्षपेक्षा अधिक काळ राजकीय केंद्रबिंदू म्हणून भरत माळी यांचे नाव जिल्ह्यातील नेत्यांमध्ये परिचित आहे.
शहरातील राजकारणात इतरही नेते प्रभावशाली आहेत मात्र भरत माळी यांचा राजकीय कित्ता कोणालाही कायम स्वरूपी गिरवता आला नाही. सतत गेल्या ३० वर्षापासून तळोदा शहरात विविध राजकीय उलथापालथी मध्ये त्यांचा सहभाग प्रत्यक्ष अप्रतुक्षरीत्या आलेले आहे. अनेक राजकीय चढउतार त्यांनी बघितले आहेत. शहादा येथे विद्यार्थी दशेत असतांना भरत माळी यांनी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूकीत सहभाग नोंदविला, तर तळोदा महाविद्यालयात देखील विद्यार्थी प्रतिनिधी चा निवडणुका त्यांनी गाजवल्या आहेत. पूर्वाश्रमीचे काँग्रेस चा वारसा लाभला असला तरी तळोदा शहर भाजप प्रेमी असल्याने देखील त्यांचा स्वतःचा सर्वसमाजातील दांडगा राजकीय संपर्कामुळे काँग्रेस पक्षाला नेहमीच वरचढ ठेवण्यात त्यांचा वाटा आहे.
चिन्हावर न लढता स्वबळावर अपक्ष म्हणून स्वबळवर ते निवडून आले आहेत. अतिशय तरुण वयात २४ व्या नगराध्यक्ष झालेत त्यानंतर मात्र स्वतः विजय सहज संपादित करत पूर्ण पॅनल आपल्या स्वतःचा जन संपर्कावर निवडण्याचा भीमपराक्रम त्यांनी छत्री चा चिन्हावर करून दाखविला होता, याच काळात जिल्हाबॅंकचा निवडणुकी दरम्यान शिरपूर चे आमदार अमरिश भाई पटेल या विकास पुरुष जवळ जवळीक वाढली धुळे जिल्हा असताना अमरीश भाई यांचे अगदी निकटवर्तीय म्हणून त्यांची राजकीय ओळख होती ,व आजही कायम आहे,
तळोदा नगर पालिकेचा राजकारणात त्यांची सर्वात घट्ट पकड समजली जाते कारण तळोदा शहराला भरत माळी ६ वेळी नगराध्यक्ष पद भूषवलं आहे. व त्यांचा पत्नी सौ, योजना भरत माळी देखील नगरअध्यक्षा पदावर होत्या यावरून त्यांचे पालिकेतील राजकीय वजन दिसून येते ,
वयाच्या २४ व्या वर्षी ते तळोदापालिकेचे नगराध्यक्ष झाले. महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण नगराध्यक्षाचा मान मिळविणाऱ्या मोजक्याच तरुण नगराध्यक्ष म्हणुन भरत माळी हे नाव घेतलं गेलं.
. सन १९९० सालापासून त्यांच्या राजकीय जिवनाची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मात्र मागे वळून पाहिले नाही. सार्वजनिक जिवनात असंख्य पदे भुषविली. . धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तळोदा पिपल्स एज्युकेशन संस्थेचे संचालक, माळी समाज सुधारणा मंडळचे अध्यक्ष, तळोदा न.पा.चे प्रतोद आदी पदांच्या माध्यमातून भरतभाईंचा राजकीय प्रवास मोठ्या संघर्षांनी भरलेला आहे. तळोदा पालिकेत वर्षानुवर्षे असलेली त्यांची सत्ता विरोधकांच्या दृष्टीने आव्हान राहिले आहे त्यांना सत्ते पासून लांब राखण्यासाठी. सर्व विरोधकांना एकत्र यावे लागेल मात्र २००२ व २००७ वगळता ते होऊ शकले नाही मात्र यावेळी देखील त्यांना सत्ता पासून लांब ठेवण्यासाठी किती राजकीय शक्ती लागली याचा अंदाज तळोदा नव्हे तर जिल्ह्याला माहित आहे .काल सायंकाळी सुमारे २५ गाड्यांच्या ताफ्यात ते रवाना झाले.








