म्हसावद l प्रतिनिधी
महिला दिनानिमित्त डॉ महेश पवार कर्करोग तज्ञ यांच्या केअर स्पेशालिटी हॉस्पिटल व केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्तनआरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन.
महिला दिनानिमित्ताने दि. १८ व १९ मार्च रोजी डॉ.महेश पवार कर्करोग तज्ञ यांच्या केअर स्पेशालिटी हॉस्पिटल पिंपळे सौदागर व केदारेश्वर लेवा गुजर प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट स्क्रीनिंग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात जवळजवळ २७० महिलांची तपासणी करण्यात आली तसेच ६० महिला डॉक्टर यांची देखील तपासणी करण्यात आली.
सध्याच्या काळामध्ये स्तन कॅन्सर आणि गर्भाशय कॅन्सर हा महिलांमध्ये विशेष करून जास्त प्रमाणात आढळून येत आहे आणि याचे वेळीच निदान झाले तर या जीवघेण्या आजारापासून निश्चितच आपण या आजाराला गंभीर स्वरूपाकडे जाण्यापासून रोखू शकतो आणि एक चांगलं आयुष्य महिलांना देऊ शकतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉ. महेश पवार सर यांनी या शिबिराचे केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे च्या समन्वयाने निःशुल्क आयोजन केले होते.
या शिबिरादरम्यान आपल्या आरोग्याप्रति जागरूकता दाखवत अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे तपासणी करून घेतली.
स्तन कॅन्सर जनजागृती करण्यासह वेळीच तपासणी करून जर स्तनकॅन्सर चे निदान झाले तर योग्य उपचाराने आपण त्या महिलांना एक निरोगी व दीर्घायुष्य प्रदान करू शकतो, व आजच्या काळामध्ये अनेक आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून आपण महिलांना एक स्वस्त आयुष्य प्रदान करू शकतो हा या मागचा उद्देश असल्याचे यावेळी सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ. महेश पवार यांनी विचार मांडले.
यापुढेही केदारेश्वर प्रतिष्ठान पुणे व केअर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून कर्करोग जागृतीसाठी कार्य करत महिलांना या आजारापासून सचेत करत यावर जनजागृती करत राहण्याचा संकल्प यावेळी डॉ.महेश पवार यांनी व्यक्त केला.