नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुका व शहर बुथ सशक्तीकरण कार्यशाळेचे आयोजन नवापूर भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात आले होते.या कार्यशाळेचे आयोजन आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत यांच्या फार्म हाऊस येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन भारत माता, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी,पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचेपुजन खा. डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावीत,जिल्हा संघटन मंञी निलेश माळी,प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्र गावीत,जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी,जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत,प्रदेश उपाध्यक्ष अल्प संख्याक मोर्चा एजाज शेख,जाकीर पठाण,सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत,पं.स सदस्य सुमन गावीत,माजी पं.स सभापती दिलीप गावीत,माजी नगरसेवक गिरीष गावीत,संदिप अग्रवाल,अँड मोहीत अग्रवाल,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,सप्नील मिस्ञी,माजी नगरसेवक महेंद्र दुसाने,सुनिता वसावे,जिग्नेशा राणा,दुर्गा वसावे,सत्यांनंद गावीत,हेमंत जाधव,दिनेश चौधरी,पवन दाडवेकर,अजय गावीत,निलेश प्रजापत आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी खा. डॉ.हिना गावीत व उपस्थित मान्यवराचा सत्कार भरत गावीत यांनी केला.त्यानंतर डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यात स्विकृत सदस्य म्हणून खा. डॉ.हिना गावीत व जयवंत जाधव यांची निवड झाल्या बद्दल भारतीय जनता पाटीच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला.यावेळी खा. डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, सर्व प्रथम मला आदिवासी सहकारी साखर कारखाण्यात स्विकृत सदस्य म्हणून निवड केल्या बद्दल मी तुमचे आभारी आहे.तसेच संसदरत्न खासदार म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे
भारतीय जनता पाटीच्या कार्यकर्त्यांनी बुथ सशक्त करण्यासाठी बुथ प्रमुखानी प्रयत्न करावे तसेच केंद्र सरकारचा विविध योजनांची नागरीकांना माहीती द्यावी जसे मोफत आनंदाचा शिधा वाटप, मोफत लसीकरण सारख्या उपक्रमांची जनतेला माहीती दयावी व येणा-या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यानी तयारीला लागावे.तसेच भारतीय जनता पार्टीने २५ वर्षा नंतर प्रथमच झालेल्या आदिवासी सहकारी साखर निवडणुक जिंकली या बाबत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोनवर अवगत केले.व आदिवासी सहकारी साखर कारखान्यासाठी भरीव निधी उपब्लध करुन दयावी अशी विनंती देखील मी केली असे खा.डॉ.हिना गावीत यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेंद्र पाटील यांनी केले तर आभार कृणाल दुसाने यांनी मानले.