म्हसावद l पुलायन जाधव
धडगाव तालुक्यातील तोरणमाळ व परिसरातील अनेक गाव पाड्यात वादळी पाऊस आज संध्याकाळी 4 वाजे दरम्यान झाला.यावेळी सुमारे अर्धा तास गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

धडगाव तालुक्यातील तोरणमाळ परिसरासह आज दि.18 मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने पडला. दरम्यान काही भागात सुमारे ३० मिनीटे गारपीट झाली.त्यामुळे शेतकर्यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.कालच नंदुरबार व साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले आत्ता याठिकाणी अचानक आलेल्या वादळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले .
आज चार वाजेच्या सुमारास तुफानी वारा व विजेचा कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले. विविध गावात सुमारे ३० मिनीटे गारपीट झाली.यात परिसरातील शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर गहु,हरभरा, मका,सोयाबीन विविध पीकांचे नुकसान झाले आहे.








