नवापूर l प्रतिनिधी
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यभर संप सुरू आहे. संपाबाबत ठोस निर्णय होत नसल्याने नवापूर तालुक्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह विविध शासकीय विभाग व शिक्षकांनी आज तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून आपल्या भावना शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.
दरम्यान, मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. सुमारे हजारावर कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले होते. विविध शासकीय विभागातील कर्मचारी संघटनांनी सहभाग घेत सर्व कर्मचारी यांनी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली.जोपर्यंत जुनी पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत बेमुदत संप सुरूच राहील, कर्मचारी आता माघार घेणार नाहीत. २८ मार्चपासून राजपत्रित अधिकारी देखील संपात सहभागी होणार आहेत.
आजच्या मोर्चाला नवापूर तालुका व शहर काँग्रेस पक्षाच्या माजी जि.प अध्यक्ष रजनी नाईक,पं.स सभापती बबीता गावीत,माजी पं.स सभापती रतीलाल कोकणी,पं.स सदस्य ललीता वसावे,तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,दामू बि-हाडे,शहर अध्यक्ष सोहेल बलेसरीया,जगदीश पाटील सह पदाधिकाऱयांनी पाठिंबा देऊन सहभागी झाले.कर्मचारी चार दिवसापासून आंदोलनावर ठाम आहेत. आज पाचव्या दिवशी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी कर्मचारी संपात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले.
शिस्तबद्ध, शांततेत मोर्चा
एकच मिशन जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी नवापूर तालुक्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती नवापूर यांनी जुनी पेन्शनसाठी मोर्चा काढला मोर्चा शिस्तबद्ध व शांततेत काढण्यात आला. येथील महात्मा गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेला ढोल वाजवत मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील गांधी पुतळा, लाईट बाजार, मेन रोड, डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तहसील कार्यालय तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना समन्वय समिती मार्फत निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, सदर समन्वय समितीची घटक संघटना बेमुदत संपात आम्ही सक्रीय सहभागी आहोत.
पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तिसगढ़, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश राज्य सरकारी जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना महाराष्ट्रा राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ज्यातून राज्यातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास उडत जाऊन शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष निदेश वळवी, उपाध्यक्ष योगराज भामरे,महिला संघटन आशा गुंजाळ,कोषाध्यक्ष बाळकृष्ण ठोंबरे,कार्यध्यक्ष योगेश महाले,सरचिटणीस दिलीप गावीत आदीचा सह्या आहेत.
यावेळी राज्य शिक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष पुरुशोतम काळे , ऑल इंडिया आदिवासी एमलोय फेडरेशनचे जिल्हध्यक्ष बाबुराव वसावे, पंचायत समितीचे रतिलाल गावीत, संदिप चौधरी,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटक मदन मुंडे यांनी मोनगत व्यक्त केले. रमेश गावीत यांनी सूत्रसंचालन केले तर नवापूर तालुका समनवय समितीचे अध्यक्ष निदेश वळवी यांनी आभार मानले. आहे.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक मोकळ,पो हे का निजाम पाडवी,विनोद पराडके,पंकज सुर्यवंशी,दादाभाई वाघ,नितिन नाईक,गणेश बच्छे यांनी चोख बदोबस ठेवला होता.








