नवापूर | प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पुर्वसंध्येला शिव जऩ्मोत्सव मोठया उत्साहात श्रीराम मंदीर गल्लीत साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मउत्सवाची सुरुवात त्यांच्या पालखीचे पुजन छत्रपती शिवाजी महाराज जन्मउत्सव समितीच्या अध्यक्षा तथा जि.प महिला बालकल्याण समिती सभापती संगिता गावीत यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील,माजी नगरसेविका अरुना पाटील,मंगला सैन,सारीका पाटील,मेघा जाधव,नितू शर्मा,आदी महिलांनी केली.या नंतर पालखी ढोल ताशाचा गजरात सरदार चौक,लाईट बाजार,शिवाजी रोड,गुजर गल्ली,कलाल गल्ली फिरुन श्रीराम मंदीर गल्लीत समारोप करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख हंसमुख पाटील,शहर अध्यक्ष अनिल वारुडे,उत्सव समितीचे अध्यक्ष हेमंत जाधव,हितेश पाटील,दर्शन पाटील सह पदधिकारी उपस्थित होते. या नंतर श्रीराम मंदीर गल्लीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषय व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार अर्पन उपस्थित मान्यवरांनी केला.या नंतर व्याख्यांनाला सुरुवात करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते किरण टिभे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषय व्याख्यन केले.या कार्यक्रमाची प्रस्तावना शिवसेना जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील यांनी केले.तर सुत्रसंचलन कवी विजय बागुल यांनी केले तर आभार हितेश पाटील यांनी मानले.








