नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्रीमती डी.आर. हायस्कूल मध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारातील जनऔषधवैद्यकशास्त्र विभागातर्फे इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांमधील लठ्ठपणा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी आरोग्याच्या दृष्टीने सकस आहार, नित्य व्यायाम व आपल्या वयानुसार वजन व उंची किती असावी तसेच स्थूलपणा वाढण्यामागचे कारणे व उपाय यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.शिवाजी सूक्रे एमबीबीएस ला प्रविष्ट असलेल्या प्रशिक्षणार्थी
ह्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ सतीश वड्डे, डॉ अमोल किनगे व त्यांच्या चमूने मुलांचे BMI तपासून त्यांना लठ्ठपणा टाळण्यासाठी मार्गदर्शन केले.
शाळेतील विद्यार्थ्यांचे वजन व उंची मोजून बी.एम आय.काढून स्थूलपणा किती आहे हे लक्षात आणून दिले. शाळेतील मुख्याध्यापक नारायण भदाणे,पर्यवेक्षक पंकज पाठक, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.








