Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल

team by team
March 7, 2023
in राज्य
0
बोरद येथील भोंगऱ्या बाजारात लाखोंची उलाढाल
बोरद l प्रतिनिधी
   होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळोदा तालुक्यातील बोरद येथे सालाबादप्रमाणे यंदाही पारंपारिक भोंगऱ्या बाजार भरवण्यात आला होता. आदिवासी बांधवांचा वर्षातील महत्त्वपूर्ण बाजार म्हणजे भोंगऱ्या बाजार हा असतो त्यामुळे मोठ्या उत्साहात बोरद येथे हा बाजार यावर्षी भरला.
   दरवर्षाप्रमाणे परंपरागत भोंगर्‍या बाजाराचे आयोजन नियोजनबद्ध रीतीने करण्यात आले होते. हा बाजार दोन दिवस चालत असल्याने होळीच्या एक दिवस अगोदर भोंगऱ्या बाजार भरत असतो. भोंगऱ्या बाजार शांततेने पार पडावा यासाठी पोलीस प्रशासन, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायतिचे आजी माजी लोकप्रतिनिधी दिवसभर बाजारात तळ ठोकून असतात.
       भोंगर्‍या बाजार सुरू होण्याअगोदर गावागावातून येणारे शेकडो आदिवासी बांधव बोरद गावात दाखल झाले होते.
 उत्साहात असलेल्या आदिवासी बांधवांनी ढोल,मांडळ व बिरीसह डफच्या तालावर बेफान नृत्य करत रंगत आणली होती. भोंगर्‍या बाजारासाठी सकाळपासून आदिवासी बांधव व विशेषतः महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर बोरद येथे दाखल होत होते. बाजार सुरू होण्यापूर्वी बाजारात ढोल तालावर नाचत होते.बासुरीच्या तालावर ते नृत्य करत होते. आदिवासी संस्कृतीचे जतन करत आदिवासी बांधव शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नृत्यामध्ये  सामील होत होते. या भोंगऱ्या बाजारात सातपुड्यातील दऱ्या, खोऱ्यातील सर्व ४५ गावातील आदिवासी बांधव हजेरी लावत होते. आणि होळीला लागणाऱ्या साहित्याची खरेदी करीत होते.
        भोंगऱ्या बाजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत खाद्यपदार्थाच्या दुकानासह विविध पूजेचे साहित्य, कपडे व लहान मुलांची खेळणी असलेली दुकाने सजली होती. महिलांकडून खोबरे, हार कंगन, खारीक,खजूर,डाळ्या, गुळ, या विविध साहित्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात होती बाजारात विविध संसार उपयोगी साहित्य ची मोठी दुकाने थाटलेली होती विविध खाद्यपदार्थाची दुकाने लावण्यात आली होती.
 महिला वर्गांच्या बांगड्यांची दुकाने विशेष आकर्षण ठरत होती ,पायातील चपलांचे दुकाने त्याचबरोबर मनोरंजन पर मौत का कुवा, जंतर-मंतर असे खेळ दाखल झाले होते. तरुण मुले, मुली हातावर टॅटू काढत होते. थंडपेय ची दुकाने थाटली होती.
  बोरद महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश तिन्ही राज्याच्या सीमेवर वसलेले असल्याने मोठ्या लोकसंख्येचे तळोदा तालुक्यातील एकमेव गाव असल्याने येथील भोंगऱ्या बाजाराच्या बाजाराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले होते. पोलीस प्रशासनातर्फे चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सरपंच यांचे पती रविन भिलाव, ग्रामपंचायत सदस्य साजन शेवाळे गौतम भिलाव,संतोष ढोडरे, मंगेश पाटील,विनोद शेवाळे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्या शेवाळे,कांतीलाल ठाकरे,संजय ठाकरे ,पेसा सदस्य पोलीस पाटील बाबुराव ढोडरे,त्याचबरोबर माजी जि. प. सदस्य नरहर ठाकरे हे दिवसभर  बाजारात तळ ठोकून होते.या दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचे समजते.
बातमी शेअर करा
Previous Post

रविंद्र गिरासे यांची घर वापसी,१५० कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

श्री.राम नवमी मिरवणुकी संदर्भात बैठक

Next Post
श्री.राम नवमी मिरवणुकी संदर्भात बैठक

श्री.राम नवमी मिरवणुकी संदर्भात बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add