नंदुरबार l प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांना नियुक्तीचे पत्र माजी आ.तथा संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले. नंदुरबार तालुक्यातील ३ तर शहाद्यातील एका पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, नंदुरबार येथील पंकज चौधरी यांची उपजिल्हा संघटक, आसाणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच युवराज पाटील उपजिल्हा संघटक, प्रफुल खैरनार तालुका संघटक तर शहादा येथील पुष्पेन्द्र चौधरी यांची उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.नियुक्त केलेल्या चारही पदाधिकाऱ्यांच्या कालावधी एक वर्षासाठी असणार आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करावा तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे असे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीच्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.यावेळी माजी आमदार तथा संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
नियुक्तीपत्र देण्याप्रसंगी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,माजी नगरसेवक दीपक दिघे,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र पेंढारकर,शहादा युवासेना प्रमुख सागर चौधरी,शिवसेना जिल्हा उपप्रमुख छोटु पाटील,शहादा तालुका उपप्रमुख आत्माराम नगराळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.