Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पुनर्वसन वसाहतींमध्ये होलिकोत्सवाला प्रारंभ, विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन

team by team
March 5, 2023
in सामाजिक
0
पुनर्वसन वसाहतींमध्ये होलिकोत्सवाला प्रारंभ, विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन
तळोदा l प्रतिनिधी
 तालुक्यातील रोझवा पुनर्वसन ,रेवानगर पुनर्वसन, जीवननगर पुनर्वसन सह वसाहतींमध्ये होलिकोत्सवाला प्रारंभ झाला असून त्यामुळे वातावरणात उत्साह असल्याचे चित्र आहे .
   आदिवासी बांधवांच्या होळी हा सण आदिम सांस्कृतिक सण म्हणजे आदिवासींच्या कुलदेवतांपैकी एक आदिम देवता अर्थात होळी जागण माता होय.त्यामुळे होळी मातेला विशेष महत्त्व असून परिसरात होळी सण उत्साहात साजरा करण्यात येत असतो. होळीमातेच्या नवस करणाऱ्यांकडून कडक नियमांचे पालन करण्यात येत असते .यालाच मानता असे म्हणतात .ती फेडण्यासाठी कुटुंबातील पुरुष हा गाव पुजारी यांच्या सांगण्यावरून मोरखी ,बावा, बुद्या, नागरा मोरखी ,धानका डोकी अशा वेशभूषा घेऊन होळीत आपला नवस फेडतात. त्यांच्याकडून नियमाचे पालन करण्यात येऊन घराबाहेर राहून ,गुरे, घरातील माणसे ,धान्य यांचे निगा राखण्यात येते व होळीमातेला आपल्या कुटुंबासह गावाच्या कल्याण, रोगराई ,नैसर्गिक संकटातून सुटका यासाठी साकडे घालण्यात येते.
   दरम्यान तालुक्यातील पुनर्वसन वसाहतींमध्ये मुळगाव असलेल्या बाधितांकडून  आपली होळी वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येत असते .रोझवा पुनर्वसन येथील मुळगाव शेलदा गावाच्या होळीस सुरुवात झाली असून त्यानंतर डोमखेडी ,जुनवणे, सिक्का, भरड गावांची होळी साजरीहोणार आहे .
रेवानगर पूर्वसन येथे परंपरागत दि 6 रोजी राजवाडी होळीनिमित्त बक्षिस देण्यात येणार आहे यात गळ्यातील ढोल प्रथम ११०५१रू द्वितीय ५०५१रु तृतीय ३०५१रु,बाबा बुद्या प्रथम ५०५१रु, द्वितीय ३०५१रू, तृतीय २०५१रू,होळी गायन प्रथम ११५१रू, द्वितीय ५११, तृतीय २५१,खुर्ची ढोल प्रथम ७५५१रू द्वितीय ३५५१रू, तृतीय २५५१रु, गेऱ्या प्रथम ४०५१, द्वितीय २०५१, तृतीय १५५१रू,बासुरी वादन प्रथम ११५१रू, द्वितीय ५५१रू, तृतीय २५१ रू यासाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन होळी उत्सव समिती व सर्व ग्रामस्थ या रेवानगर (साद्री )यांच्याकडून करण्यात आले आहे .
जीवननगर पुनर्वसन येथे दि सहा रोजी होळी साजरा होणार असून गळ्यातील ढोल, खुर्चीवाले ढोल ,बाबा बुद्या, गेरनृत्य, यांच्यासाठी बक्षीस ठेवण्यात आले आहेत .
तालुक्यातील हाडंबा दि 7 रोजी होळी साजरा करण्यात येणार असून ढोल बक्षीस ,बासरी वादन बोरख्या बुध्या, बावा ग्रुप यांच्यासाठी बक्षिसे ठेवण्यात आली असून त्यासाठी माजी सभापती यशवंत ठाकरे यांच्याकडून ढोल बक्षीस देण्यात आले असून  लकडकोट  जि प मुख्याध्यापक अमरसिंग ठाकरे यांच्याकडून मोरख्या प्रथम बक्षीस देण्यात येणार आहे.    दरम्यान होलिकोत्सवात  विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

डाबच्या होळीने सातपुड्यातील होलिकोत्सवाला प्रारंभ

Next Post

खुंटामोडी होळी पारंपारिक पद्धतीने उत्साहात ,  आज मेलादा

Next Post
खुंटामोडी होळी पारंपारिक पद्धतीने उत्साहात ,  आज मेलादा

खुंटामोडी होळी पारंपारिक पद्धतीने उत्साहात ,  आज मेलादा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add